ठळक मुद्देरताळी, खजूर, फळांना मागणी, भाज्या स्थिरशारदीय नवरात्रौत्सवामुळे बाजार फुलला
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारात विशेषत: रताळी, खजूर, फळांना ग्राहकांची मागणी होती; तर दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते; पण ऐन सणामध्ये सरकी तेलाच्या किलोदरात वाढ होऊन ते ९० रुपयांवरून ९२ रुपयांवर जाऊन पोहोचले.बुधवार (दि. १०)पासून शारदीय नवरात्रौत्सवास सुरुवात होत आहे. लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात कोबी, दुधी भोपळा, मेथीच्या पेंढीसह टोमॅटोचे ढीगच्या ढीग लागले होते. तसेच मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, सीताफळ, अननस, पपई, केळी या फळांना मागणी होती. घाऊक बाजारात रताळी दहा किलोंना १२० रुपये; तर किरकोळ बाजारात ४० रुपये, खजूर १०० रुपये, काळा खजूर १५० ते ४०० रुपयांपर्यंंत; वरी ६० पासून ८० रुपयांपर्यंत असा दर झाला आहे.
रताळ्यांबरोबरच फळांनाही आठवडी बाजारात ग्राहकांकडून मागणी होती. त्यामुळे सफरचंदांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. (छाया : दीपक जाधव)याचबरोबर सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर स्थिर होते. कोबीचा गड्डा पाच रुपये, वांगी, ढबू मिरची, दोडका, दुधी भोपळा १५ रुपये प्रतिकिलो, टोमॅटो दहा रुपये, गवार, शेवग्याची शेंग, बिनीस ३५ रुपये, ओला वाटाणा ४५ रुपये, कारली, चवळीची शेंग, वाल, भेंडी २० रुपये, वरणा ३० रुपये, फ्लॉवर आठ ते दहा रुपये, पडवळ बंडल ८५ रुपये, कांदापात पाच रुपये पेंढी; तर पालक, पोकळा, शेपू दहा रुपये असा दर होता.तसेच शेंगतेल १२५ रुपये, सूर्यफुलाच्या तेलदरात वाढ होऊन ते ८० रुपयांवरून ८५ रुपये झाले आहे. साखर ३६ ते ३८ रुपये; तर बन्सी गहू २८ रुपये, आॅलिम्पिक गहू ३४, तर सिव्होरी ३२ रुपयांवरून ३४ रुपये झाला. आंबेमोहर तांदळाच्या दरात चार रुपयांची वाढ होऊन तो ७६ रुपये झाला.कोथिंबीर, मेथी वाढली; मका कणीस, शेंगदरात घसरणकोथिंबिरीच्या दरात वाढ होऊन ती १५ रुपये, तर गेल्या आठवड्यात मेथीच्या पेंढीचा दर दहा रुपये होता. तो आता १५ रुपये झाला; पण मका कणीस व ओली भुईमूग शेंग उतरली. कणीस पाच रुपये प्रतिनग, तर ओली भुईमूग शेंग ३० रुपये प्रतिकिलो होती. ती गेल्या आठवड्यात ३५ रुपयांजवळ होती.
फळबाजारावर नजर
- मोसंबी - चुमडे ५०० रुपये
- संत्री - बॉक्स ४०० रुपये
- चिक्कू - ४० रुपये किलो
- सफरचंद - ६० ते ७० रुपये किलो
- डाळिंब - ५० रुपये किलो
- अननस - ३० ते ३५ रुपये.