शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूसची बाजारात धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:06 AM

कोल्हापूर : ‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूस आंब्यांची बाजारात सध्या ‘धूम’ पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘रत्नागिरी हापूस’ आंब्यांच्या दरात गत आठवड्यापेक्षा पेटीमागे ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ‘रत्नागिरी हापूस’चा दर सरासरी २०० ते २५० रुपये डझन झाला आहे. पिवळ्या धमक आंब्यांनी फळांचे बाजार फुलले आहेत. त्यामुळे आंबे खरेदीत तेजी आली ...

कोल्हापूर : ‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूस आंब्यांची बाजारात सध्या ‘धूम’ पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘रत्नागिरी हापूस’ आंब्यांच्या दरात गत आठवड्यापेक्षा पेटीमागे ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ‘रत्नागिरी हापूस’चा दर सरासरी २०० ते २५० रुपये डझन झाला आहे. पिवळ्या धमक आंब्यांनी फळांचे बाजार फुलले आहेत. त्यामुळे आंबे खरेदीत तेजी आली आहे.प्रत्येक वर्षी मे महिन्यात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण यंदा खराब हवामानाचा फटका बसल्याने हापूस आंब्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोकणातूनच थेट मुंबईसह इतर बाजारपेठेत आंबा जाऊ लागल्याने कोल्हापूर बाजारात आंब्यांची आवक कमी झाली होती. मार्च, एप्रिलमध्ये ‘रत्नागिरी हापूस’ ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला होता.त्याचा दर ४००-५०० रुपये डझन राहिल्याने यंदा हापूसची चव चाखायला मिळणार का? याची धास्ती ग्राहकांना होती; पण मे महिन्यात बाजारात ‘मद्रास’ व ‘गुजरात’ हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज ‘मद्रास हापूस’च्या १००० पेट्या, तर २००० बॉक्सची आवक होते. गत आठवड्याच्या तुलनेत आवक तिपटीने वाढली असून, ‘मद्रास’ पायरीची आवकही सुरू असल्याने सध्या बाजार पिवळ्याधमक आंब्यांनी बहरलेला दिसतो.घाऊक बाजारात सध्या ‘मद्रास’ हापूस सरासरी ९०० रुपये पेटी, तर बॉक्सचा दर २२५ रुपये आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंब्याच्या पेटीचा दर सरासरी १८०० रुपये होता.आता तोच दर १५०० रुपये, तर दोन डझनांचा बॉक्स ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. रायवळ आंब्याची आवक रोज ३००० पेक्षा अधिक बॉक्स होत आहे. त्यात ५० रुपयांपासून रायवळ आंब्यांचा बॉक्स मिळत आहे.हापूस आंब्यांचा घाऊक बाजारात दरदाम असाआंबा आवक सरासरी दरहापूस १६४० पेटी १५०० रुपये (पेटी)हापूस ८४७५ बॉक्स ३०० रुपये (बॉक्स)रायवळ २९०० बॉक्स १०० रुपये (बॉक्स)मद्रास हापूस ९१० पेटी ९०० रुपये (पेटी)मद्रास हापूस १८५० बॉक्स २२५ रुपये (बॉक्स)मद्रास पायरी ३०० पेटी ५०० रुपये (पेटी)मद्रास पायरी १४७५ बॉक्स १५० रुपये (बॉक्स)‘तोतापुरी’चीआवक सुरूसाधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तोतापुरी आंब्यांची आवक सुरू होते; पण यंदा ही आवक थोडीशी लवकर सुरू झाली असून, बाजार समितीत रोज दीड ते दोन टन आंबा येत आहे.