कोल्हापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे फेब्रुवारी महिना प्रेमीयुगुलांसाठी खास असतो. बाजारपेठाही ‘व्हॅलेंटाईन डे’साठी सज्ज झाल्या आहेत. रंगीबेरंगी फुले, ग्रीटिंग कार्ड, गिफ्ट, कपड्यांच्या दुकानांसह विविध वस्तुंनी बाजारपेठाही फुलल्या आहेत.शहरातील महाविद्यालयांचे कट्टे, कॉफी हाऊसेस, मॉलमध्ये सर्वत्र गुलाबी वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण १४ फेब्रुवारीच्या तयारीमध्ये मग्न आहेत. व्हॅलेंटाईन डे केवळ तरुण-तरुणींमध्ये साजरा केला जातो असे नाही, तर आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रिणींतील प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. मात्र, काही वर्षांपासून केवळ तरुणाईच्या वलयातच व्हॅलेंंटाईनला गुरफटून ठेवले आहे.अनेकजणांनी व्हॅलेंटाईन पार्टी, गेट टूगेदर असे कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंटने व्हॅलेंटाइन कपलसाठी खास कॅण्डल लाइट डिनरच्या आॅफर्सही दिल्या आहेत.या वस्तूंना मागणी....त्यामुळे तरुणाईला भुरळ घालण्यासाठी बाजारपेठा अनेक वस्तुंनी बहरल्या आहेत. प्रेम व्यक्त करताना गुलाबाचा अधिक वापर होतो. टेडी बेअर, फोटो फ्रेम, ग्रिटिंग, कॉफी मग, व्हॅलेंटाईन स्टिकर्स, एकमेकांच्या नावाचे ब्रेसलेट, आदी विविध भेटवस्तुंनी बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच म्युझिकल कपल टेडी, टेडी विथ मॅसेज बॉटल, कुशन्स विलमॅच, किचन टेडी विथ हार्ट, लव मेसेज फोटो फ्रेम, मेसेज बॉक्स, म्युझिकल ग्रिटिंग, हँगिंग हार्ट, याशिवाय लव डायरीज, मॅसेज बॉक्स, लव मॅझिक कार्ड, कपल शोपीस अशा असंख्य वस्तुंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
अनेक शोरुमध्ये सेल सुरू
आपण सगळ््यापेक्षा खास दिसण्यासाठी अनेक युवक-युवती या दिवसानिमित्त कपडे खरेदी करतात. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता अनेक शोरुमध्ये सेल सुरू केले आहेत.
दिवस अविस्मरणिय करण्यासाठी केक कापला जातो. हृदयाच्या आकाराच्या चॉकलेट केकला या दिवशी खूप मागणी असते. कॉलेजीयन्स प्रेमवीरांची पसंती असल्याने काहींनी आगाऊ बुकिंग केले आहे.किरण पाटील, केक विक्रेते.