शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हळद पाडव्याआधीच बाजारात

By admin | Published: March 01, 2016 11:57 PM

नांदेड: जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी घटल्याने यावर्षी गुढीपाडव्याच्या तब्बल महिनाभर अगोदरच नवा मोंढा बाजारात हळद दाखल झाली आहे.

नांदेड: जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी घटल्याने यावर्षी गुढीपाडव्याच्या तब्बल महिनाभर अगोदरच नवा मोंढा बाजारात हळद दाखल झाली आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे दर्जा घसरल्याने शुक्रवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ८ ते ८३०० हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. यादिवशी जवळपास दहा क्विंटल हळदीचा व्यवहार झाला. याशिवाय नवीन गव्हाचीही मोंढा बाजारात आवक झाली असून गव्हाला मात्र २०५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. तर यापूर्वी बाजारात गव्हाचे दर १६०० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे होते. शुक्रवारी लिलाव बाजारात ५७ क्विंटल गव्हाची आवक झाली.भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना हळद व गहू या पिकासाठी पाणी देणे अपुरे पडले. त्यामुळे हळदीचे खोंब म्हणावे तसे भरले नसल्याने त्याचा उत्पादनावर आणि दर्जावर परिणाम झाला आहे. काही भागात एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन येणे अपेक्षित असताना त्याचा उतारा ६ ते ७ क्विंटलवर आला आहे. तर पाण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असलेल्या भागातही हळदीच्या उताऱ्यात निम्म्याहून अधिक घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सर्व संकटाचा सामना करीत पदरात पडलेल्या हळदीला चांगला भाव मिळावा, असे वाटत असले तरी सद्य:स्थितीला जुन्या हळदीपेक्षाही कमी भाव मिळत आहेत. परंतु येत्या काही दिवसात हळदीची आवक वाढल्यास दुष्काळामुळे उत्पादन घटणार असल्याने दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी