गारगोटी,
म्हासरंग (ता. भुदरगड) येथे राजाराम भाऊ तेजम यांनी जमावबंदी आदेशाचा भंग करून मुलीच्या लग्नात जमाव केल्याबद्दल सरपंच आम्रपाली कांबळे यांनी राजाराम तेजम यांच्या विरोधात भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
म्हासरंग (ता. भुदरगड) येथे गावातील कोरोना दक्षता समितीमार्फत गुरुवारी (दि. २९) सर्व्हे सुरू असताना त्यांना गावातील राजाराम भाऊ तेजम हा त्याचे घरामध्ये ३० ते ३६५ लोक एकत्रित जमा करून त्याच्या मुलीचे लग्न करताना आढळले. कोरोना दक्षता समितीने त्यांना लग्नाबाबत परवानगी घेतली आहे का? याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदी आदेश लागू केला असतानादेखील बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल राजाराम तेजम याच्याविरोधात कोरोना दक्षता समितीमधील सदस्य सरपंच आम्रपाली कांबळे यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. असा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.