शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
4
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
5
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
6
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
7
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
8
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
9
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
10
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
11
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
13
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
15
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
16
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
17
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
18
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
19
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
20
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 6:45 PM

हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.

कोल्हापूर : जैव विविधतेने नटलेल्या कोल्हापूरपासून अवघ्या ३५ कि.मी.वर असणारे मसाई पठार आता राज्य सरकारने 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. राज्य सरकारने आज झालेल्या बैठकीत नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची घोषणा केली, त्यात मसाईचा समावेश आहे. जैवविविधता संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील ८ क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीस यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा वन परिक्षेत्रातील ५.३४ चौरस किमी क्षेत्र हे 'मसाई संवर्धन राखीव क्षेत्र' (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे मसाई पठार परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन होणार असून तिथल्या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे.पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठेपन्हाळ्यापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवारपेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते. घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.

एका बाजूला पांडवकालीन लेणी

मसाईच्या एका टोकापासून दुसरे टोक साधारण ४ ते ५ किलोमीटर आहे. या दुसऱ्या टोकावरच मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे, त्यामुळे या पठाराला मसाई पठार नाव पडले. पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत. एका बाजूला इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलforest departmentवनविभागPlantsइनडोअर प्लाण्ट्स