कागल : मराठा क्रांती मोर्चाबद्दल जनजागृती करण्यासाठी कागल तालुक्यातील ४२ प्रमुख गावांत रविवारी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. प्रत्येक गावात रॅलीचे स्वागत उत्साही वातावरणात करण्यात आले. रॅलीमध्ये तीनशेहून अधिक युवक मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते. कागल शहरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ एकत्र जमल्यानंतर सकाळी नऊ वाजता राजेंद्र जाधव यांच्या हस्ते रॅलीची सुरुवात करण्यात आली. पिंपळगाव खुर्द, व्हन्नूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, साके, बाचणी, केंबळी, बेलवडे, वाळवे बुद्रुक, निढोरी, मुरगूड, शिंदेवाडी, सुरुकली, कुरुकली, सोनगे, हमीदवाडा, नंद्याळ, सेनापती कापशी, जैन्याळ, लिंगनूर, कापशी, खडकेवाडा, चिखली, कौलगे, बस्तवडे, आणूर, म्हाकवे, गोरंबे, केनवडे, सावर्डे, शेंडूर, वंदूर, करनूर, लिंगनूर, सांगावमार्गे कागल येथे रात्री आठच्या सुमारास सांगता केली. रॅलीमध्ये मराठा समाज मोर्चाचे संयोजक नितीन दिंडे, प्रकाश जाधव, भिकाजी मगदूम, शंतनू शिंदे, राजू रजपूत, नितीन निंबाळकर, मुरगूडचे भिष्म सूर्यवंशी, दयानंद पाटील (नंद्याळ), प्रदीप पाटील (बाचणी), प्रवीण पाटील (बिद्री) उपस्थित होते.
कागलमध्ये ४२ संघटनांची भव्य रॅली
By admin | Published: October 10, 2016 12:49 AM