कोल्हापूर : अवैध मटका, जुगार व्यवसाय करणाऱ्या टोळीप्रमुख विजय लहू पाटील याच्यासह सहाजणांना सोमवारी पोलीस अधीक्षकांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. या टोळीविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्याने हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली.शासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ‘कलम ५५’अंतर्गत पोलीस अधीक्षकांना हद्दपारीचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार (पान १ वरून) सार्वजनिक स्वास्थ, सुव्यवस्था व शांतता बाधित कारणीभूत असणाऱ्या समाजकंटक व अवैध गुन्हेगारी टोळ्यांचे विरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्ह्णातील पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. अवैध मटका, जुगाराचा व्यवसाय करणाऱ्या टोळीप्रमुख विजय लहू पाटील (रा. विजय प्लाझा, देवकर पाणंद, कोल्हापूर व कांंडगांव ता. करवीर) या टोळीविरुद्ध प्रस्ताव पोलिसांनी पाठविला होता. या प्रस्तावाची चौकशी इचलकरंजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी करून हा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठविला होता. सादर केलेल्या अहवालाच्या आधारे या कार्यालयाकडून सुनावणी आयोजित केली होती. सुनावणीअंती विजय पाटील व त्याच्या नेतृत्वाखालील अवैध व्यावसायिकांच्या सक्रिय संघटित गुन्हेगारी टोळीने आर्थिक फायद्याकरिता अवैध मटका जुगारासह इतर गुन्हेगारी कृत्ये केली. त्यामुळे या कलमांनुसार सोमवारी या टोळीचा प्रमुख विजय पाटील, उमेश खंडेराव पाटील (रा. सानेगुरुजी वसाहत,कोल्हापूर), दत्ता नारायण बामणे (रा. ७४१/२ श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर), अशोक रामचंद्र राबाडे (रा. १४७९ डी वॉर्ड, राबाडे गल्ली, उत्तरेश्वर पेठ), हैय्युल अमीरहमजा मोमीन (रा.५८३ बी वॉर्ड, बालगोपाल तालीम जवळ) व संदीप दिलीप पाटील (रा. २५४२ बी वॉर्ड, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ) या सहाजणांना एक वर्षाकरिता जिल्ह्णातून हद्दपार केले.--जमिनी संपादनाचा प्रश्न...विजय पाटील टोळीतील दत्ता बामणे याने २०१० ला तपोवन प्रभागातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती, तर २०१५ ला त्याची पत्नी शोभा बामणे यांनी भाजप-ताराराणी आघाडीकडून राजलक्ष्मीनगर प्रभागातून लढविली होती. या निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला आहे. २०१५ च्या निवडणुकीत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. गतआठवड्यातच महापालिका निवडणुकीची रणधुमाळी समाप्त झाली आहे.
मटकाचालक विजय पाटील टोळी हद्दपार
By admin | Published: November 10, 2015 12:31 AM