(हॅलो ४ वर वापरावी : विश्वास पाटील)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील इमारत दुरुस्तीनंतरचे पाच लाखांचे लोखंडी साहित्य (स्क्रॅप) गायब झालेले नाही, ते शिल्लक असल्याचा अहवाल संस्थेच्या आर्किटेक्ट यांनी दिला.
या अहवालानुसार संस्थेने या साहित्याबाबत संस्था प्रतिनिधी आणि रेंदाळमधील ग्रामस्थ यांची २ मार्चला सहविचार सभा घेतली. त्यात ते साहित्य गायब झाले नसल्याची बाब सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यामुळे शाळेचे आजी-माजी मुख्याध्यापकांनी संगनमताने कोणताही गैरव्यवहार अथवा अपहार केल्याचे दिसून आले नाही. या लोखंडी साहित्याची विक्री करून येणारी रक्कम शाळेच्या बँक खात्यावर भरून त्यातून शाळेसाठी बेंच खरेदी करण्याचा निर्णय या सहविचार सभेत घेण्यात आला. त्यानुसार ३ मार्चला या साहित्याची निविदा पद्धतीने विक्री करून जमा झालेली रक्कम शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा केली असल्याची माहिती संस्थेने पत्रकाद्वारे दिली आहे.