कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तरीत्या कसबा बावडा, मार्केट यार्ड, विचारेमाळ परिसरात छापा टाकून ७ हजार १०० रुपयांची रोकड व मटक्याचे साहित्य जप्त केले.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसा खपवून घेणार नाही, शहरासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींना सूचनावजा आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण व शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत कसबा बावडा व मार्केट यार्ड परिसरात मटका जुगार घेणाऱ्यांवर छापे टाकले. यात कसबा बावडा येथे विनोद आळतेकर व अन्य एकाला ताब्यात घेऊन अकराशे रुपये रोकड जप्त केली. तर मार्केट यार्ड व विचारेमाळ परिसरातून तानाजी गायकवाड व गणपती बागडे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६ हजारांची रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या.
चौकट
करवीर पोलिसांचीही अशाच प्रकारची कारवाई
केर्ले गावच्या हद्दीत मटका घेणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. यातील मुख्य संशयित अल्पवयीन आहे. तर दीपक नावाच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मटका घेण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाइल व रोख ३६४ रुपये जप्त केले.