कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे किराणामालासह सर्व जीवनावश्यक व्यवसायांना विशिष्ट वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. एखाद्याने दुकान बंद करण्यास अर्धा तास जरी उशीर केला तरी त्याच्यावर ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. परंतु याचवेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असणाऱ्या मटक्यावर कोणीही कारवाही केलेली नाही, हे विशेष! अवैध असणारा मटका व्यवसाय पानपट्ट्यांची टपरी, घरांच्या आडोशाला राजरोस सुरू आहेत. तालुक्यातील कसबा वाळवे, कसबा तारळे, राधानगरी, राशिवडे, शेळेवाडी आदी गावांमध्ये बुकी सुरू आहेत. सध्या या मटक्याचे लोण तालुक्याच्या दुर्गम भागातही पसरले आहे. मटक्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मटक्यामध्ये पैसे गेल्याने अनेकांच्या बायका-मुलांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक व्यवसायावर वचक ठेवणारं प्रशासन लोकांना आयुष्यातून उठवणारा मटका का थांबवू शकत नाही, हा प्रश्न जनसामान्यांतून उपस्थित होत आहे.
राधानगरी तालुक्यात मटका तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:17 AM