‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त प्रसिद्ध होताच माउली केअर सेंटरच्या दीपक कदम व राहुल कदम यांनी तत्काळ सावित्रीबाई फुले रुग्णालयात संर्पक साधून, त्यांना केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी या आजींना गहीवरून आले. आपल्यांनी मला सोडून दिले आहे. तुम्ही मला आधार दिला, असे म्हणत त्या रडू लागल्या. या आजींची जबाबदारी माउली केअरने घेतल्यामुळे त्यांना आधार मिळाला.
कोट
सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यांना सोडून गेलेल्या मुलीला भेटवण्याचा आम्ही प्रयत्न करू व सध्या त्यांना आमच्या केअर सेंटरमध्ये दाखल करून घेत आहोत.
- दीपक कदम, केअर टेकर, माउली केअर सेंटर
फोटो : २२०८२०२१-कोल-माउली केअर
ओळी : सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारासाठी सोडून गेलेल्या मुलीची वाट पाहणाऱ्या सुवर्णा येळवणकर यांना माउली केअर सेंटरमध्ये रविवारी दाखल करण्यात आले.