गेले दोन दिवस जलाशय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील कर्नाटक हद्दीत असणाऱ्या पाचही जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या सर्व जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अलमट्टी जलाशयातून सर्वाधिक २ लाख क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
कृष्णा खोऱ्याच्या कर्नाटक व्याप्तीत येणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा व पाणी पातळीचा शुक्रवार, २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नोंद झालेला तपशील पुढील प्रमाणे आहे. हिडकल जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता ५१.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ३८.४२ टीएमसी, सध्याची पाणी पातळी ६३७.९३ मीटर, सध्याचा इनफ्लो ५३५९२.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो १२९.00 क्युसेस. मार्कंडेय जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता ३.६९ टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ३.२२ टीएमसी, सध्याचा इनफ्लो ६२३८.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो ४७४४.00 क्युसेस.
अलमट्टी जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता १२३.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ९१.९३ टीएमसी, सध्याची पाणी पातळी ५१७.५८ मीटर, सध्याचा इनफ्लो १९६३८९.00 क्युसेस. सध्याचा आउटफ्लो १७0000.00 क्युसेस.