शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आम्हाला शिक्षक द्याल का? : सात वर्ग, दोनशे विद्यार्थी अन् शिक्षक चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:26 AM

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे.

ठळक मुद्देमायबाप सरकार ; करंजफेणमधील विद्यार्थ्यांची हाक

दशरथ आयरे ।अणूस्कुरा : करंजफेण (ता.शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत दुसरे शैक्षणिक वर्ष संपत आले तरीसुद्धा पुरेसी शिक्षक संख्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असेलल्या शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिकतात. मात्र त्यांना शिकवण्यासाठी केवळ चारच शिक्षक आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे विषय शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून शाळेतील कला निदेशक शिक्षक पाचवी, सहावी व सातवी सेमी इंग्रजीचे वर्ग सांभाळत आहेत. सेमी इंग्रजी वर्ग सुरू असल्याने व सेमी इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना धड मराठीही येत नाही व धड इंग्रजीही येत नाही. यामुळे येथील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत.

या शाळेत किमान ७ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र शाहूवाडी पंचायत समितीकडे वारंवारपाठपुरावा करूनही काही उपयोग झालेला नाही. येथील शाळेत केंद्र मुख्याध्यापक एक पद, विषय शिक्षक चार पदे रिक्त आहेत. करंजफेण प्राथमिक शाळेत आजूबाजूच्या दहा ते बारा खेडेगावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे.

बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याचा शासन एकीकडे उदो उदो करत असताना एकेकाळी गुणवत्तेसाठी ओळख असणारी करंजफेण केंद्र शाळा आज पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या उदासीन व राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे अक्षरश: गुणवत्तेत अप्रगत ठरली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे परिसरातील संपूर्ण पिढीच वाया जाण्याची भीती पालकांना भेडसावत आहे.

शाळेत जायला रस्ताच नाहीकेंद्र शाळेची इमारत डोंगरात उभारली आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करंजफेण येथील गुरव गल्ली ते केंद्र शाळा अशा पाचशे मीटर अंतरासाठी रस्त्याची कोणतीही सुविधा नाही. मुलांना डोंगर चढून पायी चालत जाताना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना मुले पाय घसरून पडतात व दुखापत होते. धडधाकट मुलांची ही अवस्था मग दिव्यांग मुले शाळेत कशी येत असतील, याची फक्त कल्पना केलेलीच बरी. शालेय प्रशासनाने याबाबत ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी केली आहे.

 

  • परिसरातील विषय शिक्षक रिक्त असलेल्या शाळा

पेंडाखळे, सावर्डी, कांटे, अणूस्कुरा, बुरंबाळ, मांजरे, कुंभवडे, गावडी, गिरगाव, धनगरवाडा, गजापूर, शेंबवणे, गेळवडे, विशाळगड या शाळेमध्ये विषय शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे इंग्रजी व गणित विषयांचा अभ्यासक्रम शिकवणे अवघड झाले आहे.

लवकरच तालुक्यातील उपलब्ध शिक्षकांचा आढावा घेऊन मोठ्या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करून शिक्षक देण्याची व्यवस्था करणार आहोत.- पांडुरंग पाटील,  उपसभापती, शाहूवाडी

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाkolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक