शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जनतेतून महापौर; पक्षीय महत्त्व वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:26 AM

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगराध्यक्ष, सरपंचपदापाठोपाठ आता महापौर हे पदही आता जनतेतून निवडले जाण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास कोल्हापूर महानगरपलिकेचा विचार करता, सुमारे सव्वाचार लाख मतदारांतून निवडून जाणारा हा महापौर म्हणजे ‘आमदार’च म्हणावा लागेल. यापूर्वी महापौर निवड ही नेत्यांच्या मर्जीनुसार होत होती. आता तो जनतेतून होणार असल्याने नेत्यापेक्षा ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नगराध्यक्ष, सरपंचपदापाठोपाठ आता महापौर हे पदही आता जनतेतून निवडले जाण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास कोल्हापूर महानगरपलिकेचा विचार करता, सुमारे सव्वाचार लाख मतदारांतून निवडून जाणारा हा महापौर म्हणजे ‘आमदार’च म्हणावा लागेल. यापूर्वी महापौर निवड ही नेत्यांच्या मर्जीनुसार होत होती. आता तो जनतेतून होणार असल्याने नेत्यापेक्षा राजकीय पक्षांना महत्त्व येणार आहे; पण यापूर्वी महापौरपदाच्या निवडीसाठी सभागृहात होणारा घोडेबाजार आता सभागृहाबाहेर होणार आहे.जनतेतून निवडून येण्यासााठी तोे उमेदवार पैशानेही गडगंज असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सामान्यासाठी महापौरपद दुरापास्त होणार आहे. जनतेतून महापौर निवडून आला असला तरीही त्याला निर्णयात सहकार्य करणारे संख्याबळही सभागृहात असणे आवश्यक आहे; अन्यथा त्याचा शहराच्या विकासकामांवर मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गांतील महानगरपालिकांत महापौर थेट जनतेतून निवडण्याबाबतचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. त्यामुळे अनेक नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महापालिकेत वर्चस्व ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला महापौर आपल्या कव्यात ठेवणे गरजेचे असते; त्यामुळेच प्रत्येक नेत्याची महापौर आपलाच करण्यासाठी उठाठेव सुरू असते. कोल्हापूर महापालिकेचा विचार करता, सध्या काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष महापौरपद वाटून घेत आहेत. २०१५ मध्ये सध्याचे सभागृह अस्तित्वात आले, त्यांची मुदत नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. या दरम्यान, महापौरपद हे पहिल्या अडीच वर्षांसाठी ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे; तर उर्वरित वर्षासाठी महिलांसाठी खुला वर्ग आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जनतेतून महापौर हे पद कोल्हापूरला २०२० नंतरच मिळणार आहे.विशेष अधिकारही हवेतसध्याच्या स्थितीत महापौर हे मानाचे पद मानले जात असले तरी त्यांना म्युनिसिपल अ‍ॅक्टनुसार कोणतेही विशेष अधिकार दिलेले नाहीत. हे सर्व अधिकार आयुक्तांना आहेत. त्यामुळे जनतेतून महापौर निवडला गेला तरी त्यापेक्षा त्यांना विशेष अधिकार हवेत. त्यांना प्रशासकीय अधिकारांसह काही मर्यादेपर्यंत आर्थिक अधिकार देणे गरजेचे आहे.सभागृहातील घोडेबाजार बंदकोल्हापूर महापालिकेत यापूर्वी महापौरपदासाठी सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत होता; पण आता जनतेतून महापौर निवडीमुळे सभागृहात घोडेबाजार होणार नाही; पण महापौरपदाच्या उमेदवाराला जनतेवर मोठ्या रकमा खर्च कराव्या लागणार आहेत. त्यामुळे दुसºया क्रमांकाच्या स्थायी समिती सभापती निवडीवर हा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जनतेतून महापौर करण्याबाबतचा हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आता विचाराधीन असल्याचे सांगितले; तसेच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका अजून तीन वर्षे दूर आहेत; त्यामुळे जनतेतून महापौरबाबत अंतिम घोषणा झाल्यानंतर त्याबाबत विचार करू. - चंद्रकांतदादा पाटील,पालकमंत्रीमहापालिकेच्या राजकारणावर तसा परिणाम होणार नाही. नव्या धोरणामुळे उमेदवाराला पैसा खर्च करावा लागेल. भाजपने जरी हा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे महापौरपदाच्या पात्रतेचे लोक नाहीत. महापौर एका पक्षाचा आणि सभागृहातील सदस्यांचे संख्याबळ दुसºया पक्षाचे अशी अवस्था होऊन विकासकामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे ही पद्धतच चुकीची आहे.- हसन मुश्रीफ, आमदारजनतेतून महापौर करण्याचा प्रस्ताव तसा चांगला आहे. कोल्हापूरची सुज्ञ जनता गुणवत्तापूर्वक व्यक्तीस महापौरपदावर निश्चितच बसवेल. यापूर्वी पक्ष व नेते हे वजनदार व्यक्तीची निवड करीत होते. आता नव्या नियमामुळे सामान्य व अभ्यासू व्यक्तींची निवड होईल व अर्थकारणाचे राजकारण करणाºयाला चपराक बसेल. अशा पद्धतीने निवडलेल्या महापौरांना मंत्र्यांचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे.- महादेवराव महाडिक, माजी आमदारमहापौर निवड जनतेतून करण्यापेक्षा निवडून आलेल्या महापौरांना विशेष अधिकार देणे हे महत्त्वाचे आहे. सभागृहात प्रस्ताव हे आयुक्त पाठवत असल्याने त्यावर सभागृहाच्या अनुमतीने फक्त मंजुरी देण्याचे सध्या महापौरांना अधिकार आहेत. पण आर्थिक तरतूद करण्याचे अधिकार हे प्रशासनाला आहेत. यामुळे राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त होणार आहे.- प्रा. जयंत पाटील, जनसुराज्य पक्ष