कोल्हापूर : लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्यावर सोमवारी (दि. ९) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या शेवटच्या सभेत आरक्षणात बदल, आयटी पार्कसाठी टेंबलाईवाडी येथील जागा भाड्याने देणे, ई-वेस्ट नियमावली बनविणे, आदी विषयांवर निर्णय अपेक्षित आहे. मात्र, सभेपुढील सर्व प्रस्ताव कार्यालयामार्फत आल्याने प्रस्ताव पुढील मिटींग करून महापौरांचा राजीनामा घेऊन सभा बरखास्त होण्याची शक्यता असल्याची नगरसेवकांत चर्चा आहे.माळवी यांच्या राजीनाम्यानंतर महापौरपद कॉँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. दरवेळी महापौरांचा राजीनामा होणाऱ्या शेवटच्या सभेत विक्रमी संख्येने विषय सभेपुढे ठेवले जातात. महापौरांच्या लाचखोरी प्रकरणामुळे यावेळी सभेपुढे मोजकेच विषय ठेवण्यात आले आहेत. टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटसाठी आरक्षित ४५ हजार चौरस मीटर जागेपैकी १२,९०० चौ. मीटर जागेवर माहिती तंत्रज्ञान वापरासाठी (आय.टी.पार्क) आरक्षित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कसबा बावडा येथील प्रभाग क्रमांक १ येथील रि.स.नं.-३७३/१अ,३७३/१ब मधील हिरव्या पट्ट्यातील जागा बगीचासाठी आरक्षण करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला आहे. शहरात ई-वेस्ट जमा करणारे, विल्हेवाट लावणाऱ्यांना परवाना देण्याबाबत सभेत निर्णय होणार आहे. याव्यतिरिक्त रुईकर कॉलनीतील जागा भाड्याने देणे, ई वॉर्डातील रि.स.नं. १२९/२ब/३ब येथील जमीन ना-विकास विभागातून रहिवासी विभागात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची ‘फिल्डिंग’सोमवारी (दि. ९)महापौर माळवी राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्याने १५ फेब्रुवारीपर्यंत नवीन महापौरांची निवड होणे अपेक्षित आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीत ठरलेल्या पक्षीय समझोत्यानुसार दहा महिन्यांसाठी कॉँग्रेसक डे महापौरपद येणार आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
महापौरांचा राजीनामा सोमवारच्या सभेत
By admin | Published: February 03, 2015 11:41 PM