शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

महापौरांचा जामीन फेटाळला

By admin | Published: February 05, 2015 12:23 AM

लाच प्रकरण : आज स्वत:हून पोलिसांत हजर राहणार

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे यांनी फेटाळला. त्यामुळे महापौर माळवी यांना आज, गुरुवारी अटक करण्याची तयारी लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी केली आहे; परंतु माळवी ह्या स्वत:हून रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. महापौर माळवी यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन गडकरी हा कार्यकर्त्यांसह न्यायालयाच्या आवारात दुपारी दोनपासून उभा होता. दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश बोचे यांनी माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. तपासाच्या दृष्टीने ती घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेमध्ये महापौर माळवी यांना अटक होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचा जामीन नामंजूर केल्याचे सांगितले. दरम्यान, जामीन फेटाळल्याचे समजताच लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी माळवी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तेथील डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. माळवी यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी अर्धा तास पोलिसांना कळविण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालयास दिल्या. त्यामुळे त्या रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. शिवाजी पेठेतील पर्यायी जागा देण्यासाठी तक्रारदार संतोष हिंदुराव पाटील यांच्याकडून १६ हजारांची लाच स्वीकारल्याच्या संशयावरून महापौर तृप्ती अवधूत माळवी व त्यांचा खासगी स्वीय सहायक अश्विन मधुकर गडकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० जानेवारीला रंगेहात पकडले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांना सायंकाळनंतर अटक करता येत नसल्याने माळवी यांना जाबजबाब घेऊन रात्री घरी जाऊ दिले होते; तर स्वीय सहायक गडकरी याला अटक केली होती. दुसऱ्या दिवशी अटक होण्याच्या भीतीने महापौर माळवी या रक्तदाब वाढल्याचे कारण पुढे करून शनिवारी (दि. ३१) सकाळी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांचे वकील प्रशांत देसाई यांनी २ फेब्रुवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश बोचे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी अधिकारी पद्मा कदम यांनी जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांच्यातर्फे चौकशी अहवाल मंगळवारी (दि. ३) न्यायालयात सादर केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायाधीश बोचे यांनी अंतिम निर्णय बुधवारी दिला जाईल, असे सांगितले. त्यानुसार दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी जामीन नामंजूर केल्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)महापौर माळवी यांना डिस्चार्ज मिळताच अटक करून त्यांना चौकशीसाठी कार्यालयात आणले जाईल. या ठिकाणी त्यांच्या आवाजाची चाचणी घेऊन न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयास केली जाईल. आता फक्त त्यांच्या डिस्चार्जची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. - पद्मा कदम, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महापौर माळवी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्यास त्या गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन स्वत:हून लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर राहून तपासासाठी पोलिसांना सहकार्य करतील. - अ‍ॅड. प्रशांत देसाई, महापौरांचे वकीलया मुद्द्यांवर फेटाळला अर्ज महापौर माळवी ह्या प्रतिष्ठित व जबाबदार व्यक्ती असल्या तरी त्यांनी केलेला गुन्हा हा गंभीर आहे. कायद्यासमोर सर्वांना समान न्याय आहे. चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. जामीन मिळाल्यास त्या साक्षीदारावर दबाब टाकू शकतात. तसेच त्याचा साक्षीदारावर परिणाम होऊ शकतो. तक्रारदार संतोष पाटील यांना माळवी समर्थक धमकी देत असल्याने त्यांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.