तुरंबे :
तुरंबे (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या मयूरी सागर भावके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी विशांत भोसले होते. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला.
तुरंबे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे सुरेश देवर्डेकर यांच्या गटाची सत्ता आहे. माजी सरपंच जयश्री भोईटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त होते. बुधवारी झालेल्या निवड सभेत मयूरी भावके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. निवडीनंतर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सरपंच भावके यांचा सत्कार केला.
यावेळी शामराव भावके, विजय बलुगडे, विश्वनाथ तहसीलदार यांची भाषणे झाली. निवडीस पंचायत समिती सदस्या सुशीला भावके, उपसरपंच शिवाजी मगदूम, राजेश भंडारी, के. एन. तावडे, ॲड. प्रशांत भावके, पी. एस. भावके, रणजित घाटगे, ग्रा. पं. सदस्य संदीप भंडारी, अविनाश चिंदगे, अजय खोत, सागर भोईटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी युवराज कांबळे यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ३०मयूरी भावके