उजळाईवाडी (ता. करवीर) येथे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार गाव व कॉलनी वसाहतीत संपूर्ण गाव सॅनिटाईज करण्यात आले. ग्रामपंचायतच्या वतीने दोनवेळा अँटिजन तपासणी मोहीम घेण्यात आली. यात पहिल्या मोहिमेत १६९ लोकांची अँटिजन तपासणी करण्यात आली, तर दुसऱ्या मोहिमेत १५९ लोकांची अँटिजन चाचणी केली. यात आठजण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना तत्काळ जवळच्या कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल केले. उजळाईवाडीत आतापर्यंत १२२३ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे ७७टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा स्वयंसेविका, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने घरोघरी सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेतून लक्षणे असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून त्याचे वेळीच निदान होण्यासाठी १४ दिवसांसाठी अलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंध उपाययोजनेचा भाग म्हणून सध्या गावातील सर्वच वाॅर्डात ग्रा. प. सदस्यांच्या सूचनांचा विचार करून उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी ग्रामविकास अधिकारी बी. डी. कापसे, सर्व ग्रा. पं. सदस्य यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सुवर्णा माने यांनी दिली.
चौकट : तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सूचनांचा आदर करत येथे व्यापक पद्धतीने कोरोना प्रतिबंध उपायासाठी घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. अँटिजन तपासणी करण्यात येत आहे. लोकांचा पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क वाढू नये म्हणून अलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे.
सुवर्णा माने
सरपंच.