कोल्हापूर- शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थाचा भरधाव चारचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने बुधवारी पहाटे चार वाजता झालेल्या अपघातात हर्ष पुजारी हा विद्यार्थी जखमी झाला. अपघातानंतर गाडीने पेट घेतल्याने परिसरात घबराट पसरली पण सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाही.
गाडीतील स्थानिक विद्यार्थ्यांने आपल्या मित्राला फोन करुन अपघाताची कल्पना दिली. दोन विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गुजरात गोध्रा व एक मुंबईचा आहे. एक विद्यार्थी स्थानिक असल्याचे पोलीसांनी सागितले. हे विद्यार्थी अभ्यास करुन पहाटे चहा घेण्यासाठी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडे जात होते.
गाडी भरधाव असल्याने शासकीय विश्रामगृहाच्या वळणावर स्पिड ब्रेकर न दिसल्याने गाडीवरील ताबा सुटुन गाडी रस्त्याच्या बाजुला जाऊन विश्रामगृहाची भिंत तोडली. शेजारच्या के.एम.टीच्या बस थांब्यावर पलटी झाली व गाडीने पेट घेतला. गाडीमध्ये तीन विद्यार्थ्या होते.त्यातील मागे बसलेला विद्यार्थी हर्ष पुजारी हा किरकोळ जखमी झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.