राज्यात वैद्यकीय शिक्षणामध्ये पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. त्याबाबतचा बॉंड या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाला प्रवेशित होताना लिहून घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशित होईपर्यंत सेवा देणे बंधनकारक आहे. ज्यांना ही सेवा करायची नाही. त्यांना १० लाख रुपये भरून या सेवेबाबतच्या बॉंडमधून मुक्त होता येते. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने बॉंडसेवा बंधनकारक केली आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अंतिम वर्षातील विद्यार्थी काय म्हणतात?
बॉंडसेवा करण्यास आमची हरकत नाही. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांची इंटर्नशीप पूर्ण झाली, तर काही जणांची अद्याप बाकी आहे. त्यांना सेवेबाबत एकच नियम राहणार का? विद्यार्थ्यांनी निवडलेल्या सर्कलमधील त्यांना सेवेसाठी हवा असणारा जिल्हा मिळणार का? हे शासनाने स्पष्ट करावे.
-डॉ. तेजस पाटील, जुना बुधवारपेठ, कोल्हापूर.
पाच वर्षांमध्ये कधीही आम्हाला बॉंड सेवा करण्याची सवलत होती. मात्र, यावर्षी सक्तीमुळे दडपण आले आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता बॉंडसेवा करण्यास आमचा नकार नाही. पण, अनेक विद्यार्थी पी. जी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तयारी करत आहेत. त्यातच बॉंडसेवेबाबतची प्रक्रिया खूप जलदगतीने राबविण्यात आली. आम्हाला मानसिक तयारीसाठी थोडा वेळ द्यायला हवा होता.
-शौनक रुकडीकर, न्यू पॅॅलेस, कोल्हापूर.
कोरोनामध्ये सेवा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, पी. जी. अभ्यासक्रम प्रवेशाची तयारी लक्षात घेता शासनाने स्व:इच्छेने बॉंडसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे होते. नियोजन करून प्रक्रिया राबवायला हवी होती.
- अंकुर भोळे, रत्नागिरी.
चौकट
गावात सेवा नको रे बाबा
बहुतांश विद्यार्थ्यांना पदव्युतर अभ्यासक्रमांची तयारी करायची असते. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागामध्ये सेवा करण्याऐवजी पदव्युतर अभ्यासक्रमास प्रवेश कसा मिळेल, हेच लक्ष्य असते. त्यामुळे त्यांना सेवा नको वाटते.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
बॉंडसेवा करावी लागणारे राज्यातील विद्यार्थी : २,४७९
कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी : ८७
===Photopath===
220421\22kol_3_22042021_5.jpg
===Caption===
(२२०४२०२१-कोल-मेडिकल विद्यार्थी डमी)