जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील महापूर ओसरल्यानंतर पूरबाधित गावांमधील नागरिकांसह लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. या संपूर्ण काळात राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून फिरत्या मोबाईल रुग्णवाहिकेमधून आरोग्यसेवा गावोगावी जाऊन दिली होती. त्यानंतरही या सर्व भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत या हेतूने राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्राना औषधांचा पुरवठा करण्यात आला.
यामध्ये लहान मुलांसाठी सर्दी, खोकला, ताप तसेच इतर सर्व आजारांवरील त्वचारोग यासह प्राथमिक स्वरूपातील आजारांवरील सर्व औषधांचा समावेश आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, औषध निर्माण अधिकारी हाके यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - ०५०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते औषधांचा पुरवठा करण्यात आला.