निवेदनात म्हटले आहे की, १५ मीटर रुंदीच्या एकूण सव्वासात किलोमीटरपैकी केवळ २ किलोमीटरचा रस्ता मंजूर रेखांकने व खाजगी वाटाघाटीतून तयार झाला आहे. उर्वरित रिंग रोडचे काम पूर्ण करून शहरातील वाहतुकीचा ताण दूर करणे आवश्यक आहे. रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे तत्काळ टी.डी. आर देऊन ती जमीन नगरपालिकेच्या नावे हस्तांतरित करून घ्यावी, रिंग रोड विकासाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. याकामी पालिकेत स्वतंत्र अभियंता व कर्मचाऱ्यांची खास नेमणूक करावी, अशी मागणीदेखील निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री, रमजान अत्तार, बसवराज आजरी, चंद्रकांत सावंत, प्रीतम कापसे, नागेश चौगुले, राजेंद्र तारळे, दिग्विजय कुराडे, राजशेखर यरटे, किरण कदम, रफिक पटेल, युवराज बरगे आदींचा समावेश होता.
चाैकट :
गडहिंग्लजमध्ये ‘टीडीआर कॅम्प’ लावा
रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना ‘टीडीआर’चा हक्क बहाल करण्यासाठी नगररचना विभागाचा विशेष कॅम्प गडहिंग्लज शहरात आयोजित करावा, अशी मागणी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहर रिंग रोड कृती समितीचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना निवेदन दिले. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. एम. एस. बेळगुद्री, समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
क्रमांक : २४०८२०२१-गड-०९