प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४-१५ साठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार तब्बल दीड वर्षानी ऊसदर नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. मात्र, मंडळ स्थापन करण्याची व सदस्य निवडीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर हंगाम एक महिन्यावर आला असतानाही या ऊसदर नियंत्रण मंडळाला मान्यता देणारा अध्यादेश तर शासनाने काढलेला नाहीच; पण या निवड झालेल्या सदस्यांची एकही बैठक अजून घडून आली नसल्याने याहीवर्षी ऊस दराचा संघर्ष चिघळणार काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहेदेशात दुसऱ्या स्थानावर असणारा साखर उद्योग हंगाम सुरुवातीला साखर कारखानदार व ऊस उत्पादक यांच्यातील ऊस दराच्या संघर्षाने धोक्यात आला आहे. मात्र, हे ऊस दर मंडळ अस्तित्वात येऊन १५ दिवस उलटले तरी अजूनही या सदस्यांची एकही बैठक झाली नाही आणि या मंडळाला अधिकृत मान्यता देणारा अध्यादेशही अजून काढण्यात आला नाही.
ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीला मुहूर्त मिळेना
By admin | Published: September 15, 2014 11:10 PM