इचलकरंजी : येथील दि इचलकरंजी मर्चंट्स बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी राजगोंडा पाटील होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन व लक्ष्मी फोटोचे पूजन केले. त्यानंतर उपाध्यक्ष बाळासाहेब बरगाले यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडून जाधवजी पटेल यांचे तसेच अहवाल सालातील मृत व्यक्ती व सभासदांना श्रद्धांजली अर्पण केली. अध्यक्ष पाटील म्हणाले, बॅँकेकडे एकूण ठेवी १२७ कोटी ९२ लाख इतक्या असून, कर्ज वाटप ६९ कोटी ४० लाख केले आहे. बॅँकेची गुंतवणूक ५७ कोटी २८ लाख रुपये इतकी आहे. अहवाल सालात बॅँकेस एक कोटी ८२ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. व्यवस्थापक दीपक काटकर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. विलास गाताडे यांनी स्वागत केले. यावेळी बाबासाहेब चौगुले, आदगोंडा पाटील, सूर्यकांत साखरे, इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे आदींसह सभासद उपस्थित होते. विजयश्री गौड यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२६०९२०२१-आयसीएच-०५
दि इचलकरंजी मर्चंटस् बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभेत राजगोंडा पाटील यांनी मार्गदर्शन केले.