चंदगड /प्रतिनिधी -- चंदगड तालुक्यातील गिरणी कामगार व पेन्शनरांच्या न्याय हक्कासाठी सर्व श्रमिक संघामार्फत बुधवार, दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता चंदगड पंचायत समितीच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील मुंबईमधील बंद गिरण्यांचे कामगार आपल्या प्रश्नांसाठी झटत आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या लढ्याबाबत विधानसभेचे अध्यक्ष, महाडचे अध्यक्ष, कामगार मंत्री व त्यांचे सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती अतुल दिघे, शांताराम पाटील, रामजी देसाई हे देणार आहेत. तसेच पुढील आंदोलनाबाबत विचारविनिमयही करण्यात येणार आहे. यावेळी सर्व गिरणी कामगार व पेन्शनरांनी न्याय हक्कासाठी आयोजित या बैठकीला दुपारी १२ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन गोपाळ गावडे, हलमा खामकर, कृष्णा मुळीक, जानबा बोकडे, वसंत गणाचारी, कृष्णा खोराटे, साईनाथ पारपोलकर यांनी केले आहे.
चंदगड येथे बुधवारी गिरणी कामगारांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:23 AM