सांगली जिल्ह्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्यासाठी येथील जागा पाहणीदेखील विद्यापीठाच्या समितीने करून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठ हे उपकेंद्र अन्यत्र करण्याचा घाट घालत आहे का?, अशी शंका तालुक्यातील विद्यार्थी, नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. उपकेंद्र खानापूर येथे झाल्यास आसपासच्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव आदी सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी ते सोयीस्कर ठरणार आहे. भौगोलिकदृष्ट्या आणि आवश्यक त्या सोयी-सुविधांच्यादृष्टीने खानापूरमधील उपलब्ध जागा योग्य असल्याने त्याच ठिकाणी उपकेंद्र व्हावे. याबाबत पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ‘किसान सभे’चे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, सदस्य दौलत भगत, विकास देसाई, युवराज भगत, नानासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या सांगलीतील उपकेंद्राबाबत मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:37 AM