शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू

By admin | Published: February 02, 2015 10:50 PM

मयुरेशचा मृतदेह मंगळवारी गावात : नेटबॉल सामन्यानंतर बीचवर दुर्घटना

सातारा : ‘स्पोर्टस इज लाईफ’ असं वाक्य खेळाडूंच्या तोंडी नेहमीच पाहायला मिळतं. मात्र, क्रीडा नैपुण्याच्या शिखरावर असताना ‘लाईफ ल्ााईन’ तुटण्याचा दुर्दैवी प्रकार मायणी (ता. खटाव) येथील मयुरेश भगवान पवार (वय २0) या खेळाडूच्याबाबतीत घडला. केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेतील येथील बिचवर त्याचा मृत्यू ाला. सुरुवातीला ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत होते, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर पाण्यात बुडून मयुरेशचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या या चटका लावणाऱ्या मृत्यूमुळे अवघे मायणी गाव स्तब्ध झाले आहे.त्रिवेंद्रम (केरळ) येथील अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील ‘महाराष्ट्र विरुद्ध चंदीगढ’ हा सामना सोमवारी (दि.२) दुपारी १२ वाजता होता. संपूर्ण स्पर्धेत आपल्या चपळतेचं दर्शन घडविणाऱ्या मयुरेशच्या नेत्रदीपक खेळाचं दर्शन याही स्पर्धेत पाहायला मिळालं. सामन्यानंतर मयुरेशसह महाराष्ट्र संघातील मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू इतर खेळाडू बीचवर फिरायला गेले होते. त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.मयुरेश हा अत्यंत हरहुन्नरी खेळाडू. मायणी या त्याच्या गावापासूनच त्याने नेटबॉल खेळात चमक दाखविली. त्याचे प्रशिक्षक श्रीमंत कोकरे यांनी त्याच्यातील चमक ओळखून त्याला शालेय संघात घेतले. मायणीतल्या भारतमाता विद्यालयात त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे तो साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्समध्ये दाखल झाला. ११ वी व १२ वी सुरू असतानाच त्याने नेटबॉलचाही सराव सुरू ठेवला. यानंतर पुण्यातील काशीबाई नवले इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला. सध्या तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. सातारा येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेतून मयुरेशची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मयुरेश सलग आठ-नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. त्याचे वडील मायणी अर्बन बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहेत. धाकटा भाऊ आकाश याचे विटा, ता. खानापूर येथील डिप्लोमाचे शिक्षण सुरूआहे. राज्य संघातून निवडमायणी : महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनतर्फे महाराष्ट्राच्या संघातून मायणीतील मयुरेश पवार व गणेश चौधरी या दोन नेटबॉल खेळाडूंची निवड झाली होती. मयुरेशचा नागपूर येथे २२ ते ३० जानेवारीपर्यंत सराव शिबीर झाले. त्यानंतर दि. ३० व ३१ जानेवारी रोजी इंजिनिअरिंगचा त्याने पेपर दिला. दि. ३१ रोजी तो केरळला गेला होता. मयुरेशचे पार्थिव मंगळवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. तिथून ते वाहनाने मायणीत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.