शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार--रेसिडेन्सी क्लब निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रेसिडेन्सी क्लबचे १८०० पैकी १४०० सभासद हे नियमितपणे क्लबमध्ये येत नसतानाही त्यांना पूर्ण वार्षिक वर्गणी भरावी लागते. म्हणून आम्ही सत्तेवर आल्यानंतर अशा सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार असल्याची घोषणा प्रोग्रेसिव्ह ग्रुप (ओरिजिनल)चे आघाडीप्रमुख दिलीप मोहिते यांनी केली.रेसिडेन्सी क्लबची त्रैवार्षिक निवडणूक ८ आॅक्टोबरला होत असून ...

ठळक मुद्देप्रोग्रेसिव्ह ग्रुप (ओरिजिनल)चा जाहीरनामा घोषितविविध दर कमी करून सभासदांना लाभ देणार क्रीडासंकुल उभारून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा देण्याचा प्रयत्न सभासदांच्या आई-वडिलांना क्लबच्या सर्व सुविधांचा स्वतंत्रणपणे लाभ देण्याची व्यवस्था, वार्षिक फीमध्ये भरीव सवलत, सभासदांच्या २४ वर्षांपर्यंतच्या मुलांना वयाच्या ३५ वर्षांपर्यंत फीमध्ये सवलत देण्याचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : रेसिडेन्सी क्लबचे १८०० पैकी १४०० सभासद हे नियमितपणे क्लबमध्ये येत नसतानाही त्यांना पूर्ण वार्षिक वर्गणी भरावी लागते. म्हणून आम्ही सत्तेवर आल्यानंतर अशा सभासदांना वार्षिक वर्गणीत ५० टक्के सूट देणार असल्याची घोषणा प्रोग्रेसिव्ह ग्रुप (ओरिजिनल)चे आघाडीप्रमुख दिलीप मोहिते यांनी केली.

रेसिडेन्सी क्लबची त्रैवार्षिक निवडणूक ८ आॅक्टोबरला होत असून या पार्श्वभूमीवर या आघाडीचे प्रमुख आणि उमेदवारांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला जाहीरनामा घोषित केला.

याबाबत बोलताना आनंद माने म्हणाले, सन १८९८ मध्ये तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या या क्लबची नोंदणी सन १९९० च्या दरम्यान केली. सर्व समाजातील घटक या क्लबमध्ये तेव्हापासून सक्रिय झाले आणि प्रोग्रेसिव्ह ग्रुपचा पाया रचला गेला. सन २००५ मध्ये अण्णासाहेब मोहिते यांचे नेतृत्व लाभल्यानंतर कै. दीपक पाटील-सडोलीकर, दिलीप चिटणीस आणि आनंद माने यांनी क्लबमध्ये अनेक विकास योजना राबविल्या.पूर्वी कोणालाही सहजासहजी न दिसणाºया क्लबमध्ये नवीन प्रशस्त रेस्टॉरंट व बारची इमारत उभारली.

नावीन्यपूर्ण बॅन्कवेट हॉल, बॅडमिंटन हॉल व टेबल टेनिस रूम, कॅरम व कार्ड रूम, बिलीयर्ड रूम नूतनीकरण, नवीन एन्ट्रन्स लॉबी व कॉफी शॉप, ग्लास बॅक स्कॅश कोर्ट, अद्ययावत जीम, खोल्यांचे नूतनीकरण, देशातील अनेक क्लबशी करार, परिसर सौंदर्यीकरण केले. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये प्रशासनामध्ये सचिव आणि पदाधिकाºयांची मनमानी, एकाधिकारशाही, गैरव्यवहार आणि अपारदर्शी कारभार सुरू झाल्याने सभासदांच्या आणि क्लबच्या हितासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत, असे दिलीप मोहिते आणि आनंद माने यांनी सांगितले.यावेळी उमेदवार दिलीप चिटणीस, अभिजित मगदूम, रवींद्र पाटील-सडोलीकर, रणजित शहा, प्रशांत काळे, डॉ. सत्यव्रत सबनीस,चंद्रकांत राठोड, अभय देशपांडे, दिलीप जाधव, श्रीकांत मोरे, सचिन घाटगे, सुशील चंदवाणी, गिरीश रायबागे उपस्थित होते.साहित्य नेले बाहेरक्लबमधील अनेक प्रकारचे साहित्य बाहेर नेले आहे. तशी नोंद रजिस्टरमध्ये केली आहे. स्क्रॅप करण्यासाठी, जिमचे साहित्य खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया सचिवांनी राबविलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले.