शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण : संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 5:14 PM

मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो; परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांना पाठविले.

ठळक मुद्देमोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारणसंभाजीराजे यांनी व्यक्त केली नाराजी : महापालिका सभा तहकुबीबाबत चुकीचा संदर्भ

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो; परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी सांगितले. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांना पाठविले.गेली १४ वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. कोल्हापुरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे. त्या संदर्भातील उपाययोजना या महासभेत केल्या असत्या तर ते अधिक योग्य झाले असते; पण तुम्ही सर्वांनी या महासभेत माझ्या आणि पंतप्रधान मोदीजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले.

आजपर्यंत मी जेव्हा-केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेव्हा आमची भेट झालीच आहे; पण यावेळी माझी पंतप्रधानांकडे अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी; पण कोविडमुळे एवढ्या सर्वांनी एकत्र येणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणे सध्या शक्य होत नसेल कदाचित. मला एकट्याला जाऊन भेटणे आणि श्रेय घेणे शक्य झाले असते.

मी ठरवले तर त्यांना कधीही भेटू शकतो; पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्वजण मिळून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहू आणि मराठा आरक्षणाला यश हे मिळणार आहेच, या सद‌्भावनेसह कार्यरत राहू, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.गॅस पाईपलाईनला परवानगी देणे आवश्यक होते

गेल्या दीड वर्षापासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प महापालिकेच्या परवानगीवाचून रखडलेला आहे. ती तुम्ही दिली असती, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणे आवश्यक होते, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले....तर मला आनंद झाला असतामेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फकरिता साडेपाच कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणले. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मला समजते. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत, हे माझे स्वप्न असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर