शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर विश्रामगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल

By admin | Published: August 29, 2014 12:19 AM

एमएसआरडीसीची योजना : कावळा नाका परिसरासाठी निविदा प्रक्रीयेस सुरुवात

कोल्हापूर : सार्वजनिक विभागाच्या (पीडब्ल्यूडी) वापरात असलेल्या, मात्र दीड वर्षे कुलूपबंद असलेल्या ताराराणी चौकातील विश्रामगृहाची मालकी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचीच (एमएसआरडीसी) आहे. शासन आदेशाच्या १६ वर्षांनंतर विश्रामगृहाचा भार सोसवेना म्हणून हस्तांतरण करण्यात आले. आता या विश्रामगृहाचे व्यावसायीक व्यापारी संकुलात रूपांतर करण्याची योजना महामंडळाने आखली आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.‘पीडब्ल्यूडी’ची मालकी असलेले स्टेशन रोडवरील अप्पर जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान व ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृह नूतनीकरणासाठी १९९७ ला ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरण करण्याचा निर्णय झाला. अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ‘पीडब्ल्यूडी’च्या इमारत बांधण्यासाठी त्रयस्त संस्थेला पाचारण करण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेली १६ वर्षे नूतन इमारतींची पायाभरणीही ‘एमएसआरडीसी’ला करता आली नाही. दरवर्षी नवा आराखडा सादर करण्यापलीकडे काही हालचाल झाली नाही. यातच गेल्या तीन वर्षांत शहर रस्ते प्रकल्पामुळे ‘टार्गेट’ ठरलेल्या महामंडळाने कोल्हापुरातील कार्यालय बंद करून पुण्यात बस्तान हलविले.पीडब्ल्यूडी’कडून विश्रामगृहाचा मार्च २०१३ पर्यंत वापर होत होता. दरम्यान, २००९ ला ताराबाई पार्कातील नवीन शासकीय विश्रामगृह सुरू झाले. हवेशीर व प्रशस्त इमारतीमुळे नवीन विश्रामगृहातच राबता वाढू लागला. यानंतर कमी दर्जाचे ठरत गेलेले ताराराणी चौकातील विश्रामगृह राजकीय कार्यकर्त्यांचा अड्डा बनू लागल्याने दीड वर्षापूर्वी ‘पीडब्ल्यूडी’ने विश्रामगृहास टाळे ठोकले होते. दोन हजार चौरस फुटांपेक्षा अधिक जागा व्यापलेल्या विश्रामगृहावर १२ प्रशस्त खोल्या (सूट) व पार्किंगची व्यवस्था ‘एमएसआरडीसी’ करणार आहे. उर्वरित जागेवर व्यावसायिक इमारतींचे प्रयोजन असल्याचे समजते.दीड वर्षापूर्वीच हस्तांतरणविश्रामगृहाच्या हस्तांतरणाचा १९९७ चा शासन आदेश आहे. यानुसार दीड वर्षापूर्वीच हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आहे. विश्रामगृहाच्या विकासाबाबात सर्वस्वी निर्णय ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारित आहे. - एन. एम. वेदपाठक, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी