शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आयुर्वेद ग्रंथदिंडीतून निरोगी राहण्याचा संदेश

By admin | Published: October 28, 2016 11:52 PM

धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा

कोल्हापूर : ‘आयुर्वेद हा आरोग्याकडे जाण्याचा मार्ग’,‘आयुर्वेदाची जाण, राखील स्वास्थ्याचा मान’, ‘कुणी करे शमन, कुणी पंचकर्म, निरोगी जीवनाचे हेच खरे मर्म’ असे जनजागृतीचे फलक अशा वातावरणात शुक्रवारी आयुर्वेद ग्रंथदिंडी काढण्यात आली.धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशी हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ग्रंथदिंडीची सुरुवात शिवाजी चौकातून सायंकाळी वैद्य वामनाचार्य यांच्या हस्ते धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आयुर्वेद गं्रथदिंडीला सुरुवात झाली. ही दिंडी भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडपात आली. तेथून अंबाबाई मंदिरातील श्री धन्वंतरी मंदिरात येऊन तिची सांगता झाली. या ठिकाणी वैद्य रसिका देशपांडे यांनी धन्वंतरीचे पूजन करून स्तवन केले. यावेळी ‘आयुर्वेदाचे उपयोग’ याविषयीची माहितीपत्रके वाटली.या दिंडीत ‘निमा’ कोल्हापूरच्या डॉ. माधुरी कुलकर्णी, ‘निमा’ करवीरचे डॉ. मुळीक, आयुर्वेद व्यासपीठचे डॉ. शीतल देशपांडे, ‘मर्म’चे अध्यक्ष डॉ. अजित राजिगरे, कांकायन आयुर्वेदिक महाचिकित्सालयाचे डॉ. दिलखुश तांबोळी, आयुर्वेदिक अभ्यासवर्गचे शीतल देशपांडे, लक्ष्मीनारायण जनसेवा रुग्णालयाचे डॉ. हरीश नांगरे, आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशनचे डॉ. दीनानाथ माणगावे, जिल्हा केमिस्टस अ‍ॅँड ड्रगिस्टस असोसिएशनचे डॉ. शशिभाई कुलकर्णी, श्रीकृष्ण मांडे आदींंचा सहभाग होता. (प्रतिनिधी)राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त कोल्हापुरातील आयुर्वेद डॉक्टरांनी शुक्रवारी शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी काढली. या दिंडीमध्ये डॉक्टर सहभागी झाले होते.