कोल्हापूर : शहरातील भक्तीपूजानगरमधील कोरोनामक्त भाऊ बहिणीला शनिवारी दुपारी भारावलेल्या वातावरणामध्ये डिस्चाजं देण्यात आला.
यानिमित्तानं येथील अथायु हॉस्पिटलमधील वातावरण भावूक बनले होते. दारात रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ्यांचा कडकडाट अशा वातावरणामध्ये या दोघांना निरोप देण्यात आला.
यावेळी अथायु रुग्णालयात त्या भाऊ-बहिणींवर नातेवाईंक व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी फुलांचा वर्षाव केला. यातून कोरोनाग्रस्त रुग्ण निश्चितच बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. त्यांना कोरोना झाल्यानंतर येथे क्वारंटाईन करून ठेवले होते. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले. त्यांनी आवश्यक त्या सूचनांचे पालन केले. सयंम ठेवला. यातून त्यांना सदृढ आरोग्यासाठी बळ मिळाला. यांनी कोरोनावर मात करीत, सर्वांना एक दिलासादायक संदेश दिला आहे.
भक्तीपूजानगर दुपारी हे कोरोनामुक्त भाऊ-बहिणी घरी येताच शेजारी नागरिकांनी व कुटूंबियांनी जोरादार टाळ््या वाजवून या दोघांचे स्वागत केले. कुटूंबियांच्यावतीने औक्षण करून त्यांना घरी घेण्यात आले. यावेळी दोघांनी घरी रहा, सुरक्षित रहा असे आवाहन उपस्थितांना केले. यासह प्रशासन, डॉक्टर, नातेवाईक, शेजारी नागरिक यांनी दिलेल्या मानसिक आधार व पाठबळामुळे आम्ही बरे झालो अशी भावना व्यक्त केली. यामुळे या परिसरातील जणू काही आनंदोत्सव असल्याचे पाहायला मिळत होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिथाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, डॉ. मीनाक्षी गजभिये, डॉ. बी.सी. केम्पीपाटील, डॉ. योगेश साळे, अथायुचे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. सतीश पुराणिक उपस्थित होते.
या दोघांना आज कोरोनामुक्त केल्यानंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. वेळेत उपचार, संयम व आवश्यक ते नियम पाळल्यानंतर कोरोनाची लागण झालेला रुग्ण हा नक्कीच बरा होऊ शकतो असाच संदेश यातून दिला जाऊ शकतो. हे नक्की.अशीच प्रतिक्रीया यावेळी उपस्थितांधून होती.