शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

मीटर नसणारे नळ कनेक्शन होणार बंद

By admin | Published: March 09, 2017 11:52 PM

जयसिंगपूर पालिकेची मोहीम : नळधारकांची मानसिकता बदलण्याची गरज; जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर

संदीप बावचे --जयसिंगपूर शहरात ७९०० ग्राहकांपैकी यातील ९२ टक्के नळधारकांनी आतापर्यंत नळांना मीटर बसविली आहेत. साडेचार वर्षांपूर्वी जयसिंगपूर पालिकेने शहरात नळांना मीटर बसविण्याची मोहीम सुरू केली होती. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर, अशा या योजनेत शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजूनही आठ टक्के नळधारकांनी नळाला मीटर न बसविल्यामुळे येत्या एप्रिलपासून असे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम पालिका राबविणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी. शिवाय शहराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने नगरपालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा मीटर पद्धतीने करण्याची अंमलबजावणी १ जूलै २०१२ पासून सुरू झाली होती. सन २०१२-१३ मध्ये ६० टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविले. त्यानंतर टप्प्याटप्प्यांने ही मोहीम राबविण्यात आली. शहराचा वाढता विस्तार व पाण्याची मुबलकता वाढू लागल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली़ शहरवासीयांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरेशा समान दाबाने देण्याकरिता शहरात नळांना मीटर बसविण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. नळांना मीटर बसविण्याबाबत शहरवासियांत जनजागृती मोहीम राबवून ज्या ठिकाणी अडचणी आहेत, तेथेही टप्प्याटप्प्यांने मीटर बसविण्यात आले. शहरात ७९०० नळ कनेक्शनधारक असून, यापैकी ९२ टक्के ग्राहकांनी नळाला मीटर बसविलेली आहेत. मात्र, उर्वरित नळ कनेक्शनधारकांनी नळाला मीटर बसविले नाहीत. तसेच जे नळधारक नळांना मोटर लावतात, अशा नळधारकांचे येत्या एप्रिलपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पाणीपुरवठा प्रशासनाने दिली. त्यामुळे ज्यांनी मीटर बसविलेले नाहीत त्यांनी मिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे़ मोहीम तीव्र करणारपाणी करासाठी ‘कनेक्शन बंद’ची मोहीम पालिका राबवित आहे. प्रशासनाकडून पाणीपट्टी, थकबाकी वसुली अंतर्गत वर्षानुवर्षे जे नळ कनेक्शनधारक पाणीकर भरत नाहीत, अशा सुमारे तीनशेहून अधिक नळधारकांची नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने केली आहे. कर न भरणाऱ्यांना नोटिसा बजावून ही मोहीम राबविण्यात आली असून, १५ मार्चनंतर ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. पाण्याचा अपव्यव टाळण्यासाठी आणि आवश्यक तेवढाच पाण्याचा वापर करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी प्रयत्न.शहरात आतापर्यंत ९२ टक्के नळधारकांनी नळाला मीटर बसविले आहेत. जेवढा पाण्याचा वापर तेवढा पाणी कर याबाबत टप्पे ठेवण्यात आले आहेत.शहराचा पाणीपुरवठा हायटेक करण्याच्या दृष्टिकोनातून नळ पाणीपुरवठा जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धीकरणाचे नूतनीकरण याचबरोबर नवीन पाण्याची टाकी, असे पालिकेचे धोरण आहे.