शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

‘म्हाडा’चे जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूरात राबविणार

By admin | Published: April 17, 2017 7:17 PM

समरजीतसिंह घाटगे : ‘लोकमत’ ला सदिच्छा भेट

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १७ : ‘म्हाडा’ च्या वतीने केवळ एकच प्रकल्प कोल्हापूरात सुरू आहे. मात्र योग्य जागांचा शोध घेऊन गरजूंना हक्काचे घर देण्यासाठी अधिकाधिक गृह प्रकल्प कोल्हापूरात राबविणार असल्याची माहिती पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच घाटगे यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गेले तीन वर्षे ‘म्हाडा’चे अध्यक्ष पद रिक्त होते, त्यामुळे ‘म्हाडा’च्या जागा विभागात नेमक्या कोठे व कोणत्या अवस्थेत आहेत, याची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठका सुरू असून त्यामाध्यमातून नेमकी परिस्थिती समोर येईल. सध्या म्हाळुंगे (पुणे) येथे २८०० फ्लॅटचा मोठा प्रकल्प सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरांचे स्वप्न आहे, हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ‘म्हाडा’ही पुढे असेल. ‘म्हाडा’च्या माध्यमातून केवळ महापालिका व नगरपालिका क्षेत्रातच स्वस्त घरे उपलब्ध करून दिली जातात. पण आगामी काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले. अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या ही कामातील खरी अडचण असून बाहेरून काही कर्मचारी घेता येतील का? याची चाचपणीही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात काही नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबीत प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन समरजीतसिंह घाटगे यांचे अभिनंदन केले. यावेळी उप-वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, जाहीरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, वरिष्ठ बातमीदार भारत चव्हाण आदी उपस्थित होते. दर्जेदार बांधकामास प्राधान्य!‘म्हाडा’च्या बांधकामाविषयी काही तक्रारी आहेत, ही जरी वस्तूस्थिती असली तरी आगामी काळात त्या येणार नाहीत. बांधकामाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे घाटगे यांनी सांगितले. ‘म्हाडा’चे नूतन अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी सोमवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी डावीकडून चंद्रकांत कित्तूरे, विवेक चौगुले, संतोष साखरे, श्रीराम जोशी, भारत चव्हाण उपस्थित होते.