शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

‘म्हसोबाचा माळ’ शोकसागरात बुडाला

By admin | Published: April 22, 2017 1:15 AM

मृतांवर एकत्रित अंत्यसंस्कार : दोन शाळकरी मुलांवरही नियतीचा घाला

कोल्हापूर / गांधीनगर : देवदर्शनाहून परतत असताना थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मिनी बस जाऊन आदळून झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्णातील वळिवडे (ता. करवीर) येथील दोन महिलांसह सातजण ठार झाले; तर ११ जण जखमी झाले. ही घटना मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सांगली जिल्ह्णातील आगळगाव फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे. या अपघातामुळे वळिवडे येथील कोयना कॉलनीमधील म्हसोबा माळ येथे शुक्रवारी शोककळा पसरली. कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले. सायंकाळी वळिवडे येथे मृतदेहांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.वळिवडे येथील कोयना कॉलनीजवळ ‘म्हसोबाचा माळ’ ही लोकवस्ती आहे. येथील नंदकुमार जयवंत हेगडे यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी देवदर्शनासाठी सोमवारी (दि. १७) गेले. पंढरपूर येथून देवदर्शन घेऊन घरी परतत असताना अपघात झाला. हे वृत्त समजताच म्हसोबाचा माळ दु:खसागरात बुडाला. कोयना कॉलनी, म्हसोबा माळ येथे १९८७ ला मागासवर्गीय गृहनिर्माण कामगार सोसायटी स्थापन झाली. कोल्हापूर जिल्ह्णातील सांगाव, कागल, बानगेसह निपाणी परिसरातील स्थलांतरित लोक येथे राहतात. दरवर्षी उन्हाळी सुट्टीत सर्वजण एकत्रित देवदर्शनासाठी जातात.यंदा नंदकुमार जयवंत हेगडे यांच्यासह त्यांच्या पत्नी रेणुका मुलगा आदित्य व सासू रेखा राजाराम देवकुळे यांच्यासह २८ लोक एक मिनी बस आणि दुसऱ्या चारचाकी वाहनांतून देवदर्शनाला गेले. मिनीबसमध्ये १९, तर दुसऱ्या वाहनामध्ये नऊजण होते. सोमनाथ मंदिर, विजापूरसह अलमट्टी धरण, बदामी, अक्कलकोट, तुळजापूर करून गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सर्वजण पंढरपूरला आले. त्या ठिकाणी देवदर्शन करून रात्री कोल्हापूरला येण्यास निघाले. त्या वेळी मध्यरात्री मिरज-पंढरपूर रस्त्यावर आगळगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. जखमींपैकी रेखा राजाराम देवकुळे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला.अंत्ययात्रेत आमदार अमल महाडिक, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, जि. प. सदस्य कोमल मिसाळ, आमदार सतेज पाटील यांचे ग्रामीण संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब माळी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष दिलावर मुल्ला, सरदार मिसाळ, अहिल्या फौंडेशनचे कृष्णात शेळके, अमोल एकल, हेमलता माने, रोहन बुचडे, आनंदा घोळे, पप्पू पाटील, महेश छाबडिया, श्रीचंद पंजवानी, विनोद अहुजा, अनिल हेगडे, जयवंत कांबळे, माजी सरपंच सुभाष सोनुले, गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ आदी सहभागी झाले. अंत्यसंस्कारासाठी आमदार अमल महाडिक यांनी दहा हजारांची मदत संबंधित कुटुंबीयांना केली. दुसऱ्या भाड्याने घेतले बळी..म्हसोबा माळ येथील नंदकुमार हेगडे यांच्यासह मित्रमंडळींना मिनी बसमधून नेणारा माले (ता. हातकणंगले) येथील मिनी बसचा चालक संदिप यादव (रा. माले मुडशिंगी) हा दुर्घटनेनंतर पसार झाला. त्याला शुक्रवारी दुसरे भाडे असल्याने त्याने गुरुवारी (दि. २०) रात्रीच आपण सर्वजण निघूया, असा आग्रह धरल्याचे म्हसोबा माळमधील नागरिकांनी पत्रकारांना सांगितले.मृतांची नावे : विनायक मार्तंड लोंढे (वय ५0), गौरव राजू नरदे (९), रेणुका नंदकुमार हेगडे (३५), नंदकुमार जयराम हेगडे (४0), आदित्य नंदकुमार हेगडे (१३) रेखा राजाराम देवकुळे (४0 सर्व राहणार म्हसोबा माळ, कोयना कॉलनी) व लखन राजू संकाजी (३0 रा. इंदिरानगर झोपडपट्टी, वळिवडे),जखमींची नावे :स्नेहल ऊर्फ नेहा कृष्णात हेगडे (२0), काजल कृष्णात हेगडे (१९), कल्पना शाहू बाबर (३५), कोमल सुनील हेगडे (२१), शीला सुनील हेगडे (३९), सारिका संजय कांबळे (४0), शुभम संजय कांबळे (८), भारती संजय कांबळे (२0), सावित्री बळवंत आवळे (५५), अनमोल नंदकुमार हेगडे (१२), श्वेता कृष्णात हेगडे (१५), गौरी ऊर्फ संस्कृती कृष्णात हेगडे (८) जखमी झाले आहेत. सांत्वनासाठी रीघ..घटनेनंतर आमदार अमल महाडिक, हेमलता माने, निवास लोखंडे, ग्रामपंचायतीचे सदस्य बुचडे, सचिन जोशी, अनिल हेगडे, राजू ठोमके यांच्यासह इतरांनी म्हसोबा माळ येथे धाव घेऊन त्यांचे सांत्वन केले.दृश्य अंगावर शहारे आणणारेजेवण झाल्यानंतर आमचे वाहन पुढे गेले. त्यावेळी आमच्या चालकाला मिनी बसच्या चालकाचा अपघात झाल्याचा मोबाईलवर निरोप आला. त्यामुळे आम्ही परतून लगेच घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. भीतीमुळे आम्ही सर्वजण वाहनामध्ये बसून राहिलो. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली अशी माहिती मालन रमेश कांबळे यांनी पत्रकारांना दिली.सामान्य कामगार.. मृत लखन संकाजी हा गांधीनगरमध्ये कापड दुकानात कामाला होता. तो अविवाहित होता. विनायक लोंढे हा सेंट्रिंगचे काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रोनक नरंदे हा गांधीनगरमधील कुमार विद्यामंदिरमध्ये पहिलीत होता.एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नंदकुमार जयवंत हेगडे व त्यांच्या पत्नी रेणुका नंदकुमार हेगडे, मुलगा आदित्य नंदकुमार हेगडे व सासू रेखा राजाराम देवकुळे या एकाच कुटुंबातील चौघाजणांवर काळाने झडप घातली. रेखा देवकुळे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कामगार होत्या, तर त्यांची मुलगी रेणुका हेगडे माजी ग्रा. पं. सदस्य होत्या.