कोल्हापूर : कोरोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर प्रोत्साहन पॅकेजमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग आणि बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल, असे मत उद्योजक, तज्ज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.फौंड्री हब अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूरमधील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, आदी औद्योगिक वसाहतींमध्ये एमएसएमई उद्योगांचे प्रमाण अधिक आहे. सरकारच्या या पॅकेजअंतर्गत उद्योग पतहमी कार्यक्रमासाठी पात्र असलेल्या, कर्जाच्या हप्त्यांना एक वर्ष सूट दिली जाणार आहे. त्याचा ह्यएमएसएमईह्णला मदत होणार आहे. सर्कल दरांपेक्षा कमी किमतीमध्ये घरांची विक्री केल्यानंतर मिळणाऱ्या सवलतीमुळे कराची रक्कम कमी होणार असल्याने त्यामुळे येथील बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.चांगला फायदाभविष्यनिर्वाह निधीतील सरकारच्या गुंतवणुकीचा फायदा जिल्ह्यातील एमएसएमई उद्योगांना होणार आहे. नवीन घरखरेदी करणाऱ्यांसाठी सर्कल आणि ॲग्रीमेंट रेटमधील तफावत २० टक्क्यांपर्यंत चालणार आहे. त्यामुळे दर कमी झालेल्या घरांची विक्रीस हातभार लागणार आहे. ह्यआरबीआयह्णने व्याजदर माफीच्या योजनेत को-ऑपरेटिव्ह बँकांना सामावून घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील कर्जदारांना चांगला फायदा होणार असल्याचे सीए चेतन ओसवाल यांनी सांगितले.जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- एमएसएमई उद्योगांची संख्या : ५८६१५
- या उद्योगांतील ऑटोमोबाईलच्या उत्पादनाचे प्रमाण : ७० टक्के
- बांधकाम प्रकल्पांची संख्या : २००
- तयार असलेल्या घरांची संख्या : १०००