शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

साखर विक्रीचे किमान दर ठरणार-: साखर उद्योग सरकारी नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:53 AM

घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढावेत यासाठी केंद्र सरकार आणखी उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. साखरेचा शिलकी साठा (बफर स्टॉक) करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, दर महिन्याला साखर खुली करण्याची यंत्रणा निर्माण करणे, कारखान्यांनी साखरेची विक्री करताना तिचा राज्यनिहाय किमान दर ठरविणे यासारख्या उपायांचा त्यामध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते. असे झाल्यास अंशत: नियंत्रणमुक्त असलेला साखर उद्योग पुन्हा सरकारी नियंत्रणाखाली येणार आहे.

साखर उद्योग २०१३ पूर्वी सरकारच्या नियंत्रणाखाली होता. त्यावेळी लेव्ही साखरेचा कोटा केंद्राकडून ठरवून देण्यासह विविध निर्बंध होते. हा उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त केल्यानंतर एफआरपी वगळता बहुतांशी निर्बंध शिथिल केले आहेत. अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्राने २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. कारखान्यांना त्याचा कोटा ठरवून दिला आहे. तसेच ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल ५५ रुपये अनुदान देऊन कारखान्यांवरील एफआरपीचा तेवढाच भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

एवढे करूनही बाजारातील साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. ते वाढायला तयार नाहीत. दर वाढले नाहीत तर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट होणार आहे. २० हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांचे एफआरपीपोटी कारखान्यांकडे देणे आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणखी उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच भाग म्हणून साखरेचा बफर स्टॉक करणे, इथेनॉलचे दर वाढविणे, साखर विक्रीचा किमान दर ठरविणे, यासारख्या उपाययोजना सरकारच्या विचाराधीन आहेत.पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार!केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय बहुइंधन धोरण २०१८ मंजूर केले आहे. त्यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी कोट्यवधी रुपयांची खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. हे इथेनॉल दुसऱ्या पिढीतील म्हणजे अपारंपरिक कृषी आधारित कच्च्या मालापासून तयार करणार आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत पेट्रोलियम पदार्थांमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याला केंद्र अनुमती देण्याची शक्यता आहे. सध्या पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते.३0 लाख टन साखरेचा बफर स्टॉक?यंदा मात्र साखरेचे ३१० लाख टन उत्पादन झाले आहे. आरंभीची शिल्लक साखर ४० लाख टन होती. देशाची मागणी २५० लाख टन असल्यामुळे सुमारे एक लाख टन साखर अतिरिक्त आहे. यातील पुढील हंगामापर्यंत ४० लाख टन साखरेची गरज गृहित धरली, तर ६० लाख टन साखरेची निर्र्गत होणे आवश्यक आहे.यातील २० लाख टन साखर देशभरातील व्यापाºयांकडे असेल, असे गृहित धरले, तर किमान ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाgovernment schemeसरकारी योजना