शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हसन मुश्रीफ यांना केवळ लाडकी खुर्ची हवी, रोहित पवारांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:14 IST

कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आमच्या विचारांबरोबर

मुरगूड : शरद पवार यांनी इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी हसन मुश्रीफ यांना ताकद दिली. तरीही ते त्यांना सोडून गेले. यावर तुम्हाला जायचं असेल तर जा काही फरक पडणार नाही. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आमच्या विचारांबरोबर आहे, असे पवार यांनी सांगितले. पालकमंत्री मुश्रीफ यांना आता जनतेशी देणे घेणे नाही तर त्यांना फक्त लाडकी खुर्ची हवी आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.मुरगूड येथे समरजीत घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते. पवार म्हणाले, त्यांच्याजवळ पैसा, कॉन्ट्रॅक्टर, दादागिरी, मलिदा आहे. आमच्याजवळ शरद पवार व त्यांचे आदर्श विचार, निष्ठा, स्वाभिमानी जनता आहे. कागल, गडहिंग्लज, उत्तूरकरांनी यावेळी निष्ठेला, विचाराला ताकद द्यायची आणि गद्दारीला कोणत्याही परिस्थितीत गाडायचे ठरविले आहे. मला माहीत नाही की मुश्रीफांनी येथील जनतेला का पळून गेलो हे सांगितले आहे की नाही. मात्र इथल्या मातीने आपल्याला लढायला शिकवलं आहे, पळून जायला नाही. आम्ही लढलो, ते मात्र पळून गेले. मंत्रिपदासाठी त्यांनी पवार साहेबांच्या विचारांना बाजूला त्यांचा करून अपमान केला.समरजीत घाटगे म्हणाले, पालकमंत्री कागलचा विकास केला म्हणतात, तर मग येथील जनतेला आरोग्य सेवेसाठी पुण्या-मुंबईला का जावे लागते. हे मंत्र्यांचे अपयश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, २५ वर्षांत विकासापेक्षा घरे फोडण्याचे तर नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या पराभवाचा विडा जनतेने उचलला आहे. याची जाणीव झाल्याने ते चुकीच्या भाषेचा वापर करत आहेत.यावेळी उद्धवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, शिवाजीराव खोत, संकेत भोसले, स्नेहलता पाटील, अमरसिंह चव्हाण, अजित मोरे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर, प्रवीण चौगुले, दयानंद कांबळे, अनिल मोरे, विशाल भोपळे, मारुती पुरीबुवा, सायली महाडिक, बाळासो हेगडे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विश्वजित पाटील, पदमसिंह पाटील, वीरेंद्र घाटगे, संतोष मेंगाणे, नितीन देसाई, एकनाथ देशमुख, सागर पाटील, दयानंद पाटील, बजरंग सोनुले, दत्तामामा खराडे आदी उपस्थित होते. स्वागत विशाल भोपळे यांनी केले. प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले. आभार दगडू शेणवी यांनी मानले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलRohit Pawarरोहित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफ