जयसिंगपूर : आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, कोविड सेंटरमधील रुग्णांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. पारंपरिक उत्सवी कार्यक्रमांना फाटा देऊन प्रत्येकाने एक झाड लावून भविष्यासाठी सावली आणि ऑक्सिजन निर्माण करण्यास प्रयत्न करावेत, असा संदेश वृक्षारोपणाच्या माध्यमातून देण्यात आला.
राज्यमंत्री यड्रावकर यांचा वाढदिवस शिरोळ तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जयसिंगपूर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात आला. ‘एक झाड लावू या, भविष्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती करू या’, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. दत्तवाड येथे रक्तदान शिबिराबरोबरच आशा वर्कर यांना पीपीई किट व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. यड्रावकर फाउंडेशन, आम्ही यड्रावकर व नूर काले युवाशक्ती यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी डी.एन. सिदनाळे, नूर काले, सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नाना नेजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
जयसिंगपूर येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी राजेंद्र आडके, शीतल गतारे, असलम फरास, सुभाष मुरगुंडे, संजय पाटील- कोथळीकर, अर्जुन देशमुख, संभाजी मोरे, दादा पाटील- चिंचवाडकर, राजू झेले, राहुल बंडगर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. उदगाव येथे कुंजवन कोविड सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे जीवनावश्यक साहित्य सुपुर्द करण्यात आले. कोथळी येथे संजय नांदणे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. अब्दुललाट येथे शरदचे संचालक एस.के. पाटील, जे.जे. पाटील, डॉ. दशरथ काळे, वृषभ चौगुले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. शिरटी, नांदणी येथेही वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संजय बोरगावे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अण्णासाहेब सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.