उद्या चौकशीसाठी पाचारण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांच्याबद्दल गेले दोन दिवस ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेऊन सोमवारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी चौकशीसाठी बोलवले आहे. आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनीही बोरसे यांच्याबद्दलची माहिती मागवली असल्याचे सांगितले. चारही जिल्ह्य़ांतील कर्मचाऱ्यांमध्ये बोरसे यांच्या कार्यपद्धतीबाबत असंतोष आहे.
राज्य शासनाकडून औषधे ठेवण्यासाठी आलेला वाॅक इन कूलर झाडाखाली पडून आहे. हा कूलर ज्याठिकाणी बसवण्यात येणार आहे त्या इमारती मध्ये स्वतः उपसंचालक राहत आहेत. नर्सिग ट्रेनिंग सेंटर मध्ये याच कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी नियमबाह्य राहत असून या दोन्ही अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी आहेत. शासनाकडून येणारे अनुदान वाटपातही दुजाभाव केला जात असल्याचे समजते.
याबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकमत’मधील बातम्या मी वाचल्या असून माझ्याकडेही त्यांच्याबद्दल तक्रारी आल्या असल्याचे सांगितले.
फोटो : २९०५२०२१-कोल-बंद कुलर
कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे औषधे ठेवण्यासाठी आलेला तीन कोटींचा कूलर तंत्रज्ञ मिळाला नाही म्हणून अजून जोडलेला नाही. तो औषध भांडार आवारातील झाडाखाली पडून असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी दिल्यावर तो कूलर असा प्लॅस्टिकच्या कागदात बांधून ठेवण्यात आला. (दीपक जाधव)