शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Rajendra Patil: मंत्री यड्रावकरांच्या समर्थनात-विरोधात मोर्चा, पोलिसांसोबत झटापट; वातावरण तणावपुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:41 PM

यड्रावकरांच्या कार्यालयाकडे जाण्याव अटकाव केल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. अन् शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकुच केली.

कोल्हापूर : शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्याने शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. यातील एक गट समर्थनात तर दुसरा गट विरोधात रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिंदे गटात सामील झाल्याने आता त्यांच्या विरोधात जयसिंगपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. तर, आम्ही यड्रावकर म्हणत हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले आहेत. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार झटापट झाली.कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटात सामील झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यानंतर शनिवारी संतप्त शिवसैनिकांनी राजेश क्षीरसागर यांचे फलकावरील फोटो फाडून निषेध केला. यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपुर्ण बनले.दरम्यान आज, सोमवारी शिवसैनिक यड्रावकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवसैनिकांना यड्रावकरांच्या कार्यालयापर्यंत जावू न दिल्याने शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट झाली. अन् शिवसैनिकांनी यड्रावकरांच्या कार्यालयावर आगेकुच केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ