प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी - नवी मुंबई येथील मांजरेकर कुटुंबीय दत्त दर्शनासाठी दुपारी नृसिंहवाडी येथे आले. दुपारी 3.30 च्या दरम्यान नदीमध्ये पाय धुवून दत्त दर्शनासाठी थांबले यावेळी स्विमिंग टॅंक मध्ये पोहणे शिकणारा त्यांचा मुलगा राज याने नदी पाहून नदीमध्ये अंघोळ करायसाठी हट्ट धरला.
मांजरेकर कुटुंबीयांनी आंघोळीचा विषय बाजूला ठेवून मंदिरात दर्शनासाठी गेले. मात्र राजने आई-वडिलांचा डोळा चुकून मंदिराचे दक्षिण बाजूस असलेल्या घाटावर नदी गाठली अंगावरील कपडे काढून पायरीवर उतरत उतरत पाण्यात गेला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. ते पाहून नदी शेजारी असलेल्या महिलांनी आरडा-ओरड केली व केवळ दैव बलवत्तर म्हणून वजीर रेस्क्यू फोर्स चा शिवराज सोनार तसेच अक्षय शिंदे, दादू हजारे हे तेथे आले सदरची घटना पाहतात क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नदीत उडी मारून राजला बाहेर काढले व आई वडिलांना हुडकू लागले आई-वडील यावेळी मंदिरात होते होते सदरची घटना त्यांच्या लक्षात येतात आई-वडिलांनी मुलाला कवटाळून धरले व हुंदका देऊन रडू लागले. केवळ दैव बलवत्तर म्हणून राजाचे प्राण वाचले खरे मात्र नदी काठी जाताना मुलांवर लक्ष ठेवायलाच हवं.