शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

मिरजेत शिवसेना संपर्कप्रमुखांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड

By admin | Published: April 22, 2015 11:41 PM

आंदोलन-प्रतिआंदोलन : गटबाजी चव्हाट्यावर

मिरज : शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करीत, मिरजेत शिवसेना कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढली. मार्केट चौकात त्यांच्या पुतळ्यास शेण फासण्यात आले. या प्रकारानंतर दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी बानुगडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून पोलिसांत तक्रार दिली.शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतून संपर्कप्रमुखाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीतून हा प्रकार घडल्यानंतर संपर्कप्रमुख बानुगडे पाटील समर्थक गटानेही मोर्चा काढला. शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी व माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार, बजरंग पाटील यांच्या गटात वैमनस्य आहे. पदाधिकारी निवडीवरून दोन्ही गटात पराकोटीचा संघर्ष आहे. तालुकाप्रमुख निवडीवरून सूर्यवंशी समर्थक रवी नाईक यांनी बजरंग पाटील समर्थक चंद्रकांत मैगुरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी चाकू हल्ला केला होता. जोरदार गटबाजीमुळे मिरज तालुक्यातील पदाधिकारी निवडी स्थगित आहेत. बुधवारी संपर्कप्रमुख बानुगडे-पाटील सांगलीच्या दौऱ्यावर होते. त्यांची सांगलीत बैठक सुरू होण्यापूर्वी तालुकाप्रमुख रवी नाईक, गजानन मोरे, आनंद रजपूत यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी दुपारी किल्ला भागातून मार्केटमधील श्रीकांत चौकापर्यंत बानुगडे-पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावर बसवून धिंड काढली. पुतळ्यास चपलाचा हार घालून श्रीकांत चौकात शेण फासण्यात आले. बानुगडे-पाटील पैसे घेऊन शिवसेनेची पदे देत असल्याचा आरोप करीत रवी नाईक यांनी त्यांचा निषेध केला. आंदोलनात भगवे झेंडे व शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र घेऊन कार्यकर्ते सहभागी होते.संपर्कप्रमुखांच्या पुतळ्याची धिंड काढणारे जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांचे समर्थक मानले जातात. या घटनेनंतर बानुगडे-पाटील यांच्या समर्थनासाठी सूर्यवंशी विरोधक गटाचे कार्यकर्ते जमले. चंद्रकांत मैगुरे, विशाल रजपूत, सुनीता मोरे, संजय काटे, बबन गायकवाड, सचिन कोरे, महादेव सातपुते यांनी बानुगडे-पाटील यांच्यावरील आरोपांचा निषेध करीत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संपर्कप्रमुखांचा पुतळा जाळल्याबद्दल रवी नाईक, आनंद रजपूत, गजानन मोरे या तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी संपर्कप्रमुखांविरोधातील आंदोलनाशी संबंध नसल्याचा पवित्रा घेतला आहे. (वार्ताहर)