पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार ज्योत्स्ना पालकर यांच्या शेजारी राहणारी सावित्री विनायक जाधव यांनी संशयित आरोपी जाधव याची ओळख करून दिली. पृथ्वीराज जाधव हा देवऋषीचे काम करतो, असे सांगितले. जाधव याने ज्योत्स्ना पालकर यांना तुमच्या मुलाला नोकरी लागत नाही. त्यामुळे आपण तणावाखाली आहे, असे सांगून तुमच्या मुलावर कोणीतरी करणी केली आहे. ती करणी काढण्यासाठी पाच हजार रुपये द्या, अशी सांगितल्याने पालकर यांनी पाच हजार रुपये त्याला दिले.
पुन्हा १५ आँगस्ट २०१९ रोजी जाधव पालकर यांच्या घरी येऊन मुलावर मोठी करणी केली आहे. तुम्हाला आणि रक्ताच्या उलट्या होतील, अशी भीती घालून त्याला बंधन करण्यासाठी घरातील सोने, पैसे द्यावे लागतील. करणी सुटली की आठ दिवसांत परत देतो, असे सांगितले. यावेळी पालकर यांनी सोन्याचा लक्ष्मीहार, चेन, टॉप्स, रिंगा, टिक्का, सोन्याची कर्णफुले, अंगठ्या असे एकूण १ लाख ३४ हजार ४०० रुपयांचे दागिने व रोख १ लाख ३५ हजार रुपये असा एकूण २ लाख ६९ हजार ४०० रुपये घेतले होते. ते अद्याप परत दिले नाहीत. त्यामुळे फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.