छावा अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, तालुका समन्वय प्रशांत वाळवेकर व अन्य कार्यकर्त्यांनी दिव्यांगांना निरोप दिले होते. कागल शहरातील दिव्यांगांसाठी २५ तर तालुक्यातील दिव्यांगांसाठी २५ असे ५० डोस येणार असल्याने ५० दिव्यांगांना निरोप दिले होते. गर्दी होऊन त्रास होऊ नये यासाठी हे नियोजन होते. पण या ५० पैकी अवघे २१ जणच डोससाठी आले. तालुक्यात दिव्यांगांची संख्या सहाशेच्या दरम्यान आहे. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुनीता पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थित दिव्यांगांचे स्वागत केले. ज्या दिव्यांगांनी आज लस घेतली. त्यांनी अन्य दिव्यांगांचा गैरसमज दूर करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या वेळी दिलीपसिंह राजे कर्णबधिर, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, संतोष मिसाळ, विश्वजित पोतदार आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
कागल येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या दिव्यांग भगिनीचे गुलाबपुष्प देऊन डाॅ. सुनीता पाटील यांनी स्वागत केले.