लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यावरण संवर्धनाला बळ देण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठातील ‘मियावाकी घनवन’ प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील विविध दहा ठिकाणी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावून छोटी घनदाट वने तयार केली जाणार आहेत. त्याचे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात डिसेंबरपर्यंत पाच वने पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
‘मियावाकी’ पद्धतीने लावलेली रोपे नेहमीप्रमाणे लावलेल्या रोपांपेक्षा दहापट अधिक वेगाने वाढतात. किमान जागेत कमाल प्रमाणात झाडांची वाढ होते. पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनाला त्याची मदत होते. त्यामुळे विद्यापीठाने मियावाकी पद्धतीने दहा ठिकाणी छोटी वने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम विद्यापीठाचा उद्यान विभाग करणार आहे. या प्रकल्पातील पहिले वन विद्यापीठाचे प्रवेशद्धार क्रमांक आठ ते मुलांचे वसतिगृह या मार्गावर पाच गुंठे जागेत साकारले जाणार आहे. त्यामध्ये आंबा, जांभूळ, चिंच, उंबर, आवळा, आदी देशी, स्थानिक अशी विविध ३५० रोपे लावली जातील. त्यासाठी तीन बाय तीन फूट अंतरावर खड्डे मारून प्राथमिक तयारी उद्यान विभागाने पूर्ण केली आहे. पावसाची सुरुवात झाल्यानंतर रोपे लावण्यात येणार आहेत. या मियावाकी घनवन प्रकल्पामुळे विद्यापीठासह कोल्हापूरच्या वृक्षसंपदेमध्ये भर पडणार आहे.
चौकट
‘मियावाकी’ काय आहे?
जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी नैसर्गिक वननिर्मिती प्रक्रियेचा अभ्यास करून मियावाकी ही कृत्रिम वननिर्मितीची पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत कमी जागेत स्थानिक रोपे जास्त लावली जातात. या पद्धतीने लावलेली रोपे ही दहापट अधिक वेगाने वाढतात. त्यामुळे वनराई निर्माण होऊन त्याठिकाणी पक्षी, फुलपाखरे आदी स्वरूपातील जैवविविधता वाढण्यास मदत होते.
प्रतिक्रिया
पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संवर्धनाच्या उद्देशाने विद्यापीठाने मियावाकी घनवन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या वनांचा कार्बन उत्सर्जन, गारवा, ऑक्सिजननिर्मिती आदी विविध उपयोग होतो. विद्यापीठात विविध दहा ठिकाणी घनवने साकारण्यात येतील. ती येत्या दोन वर्षांत पूर्ण केली जातील.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
फोटो (०४०६२०२१-कोल-मियावाकी घनवन प्रकल्प ०१ व ०२) : शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मियावाकी घनवन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशद्धार क्रमांक आठ ते मुलांचे वसतिगृह मार्ग या परिसरात पहिले घनवन साकारण्यात येणार आहे.
===Photopath===
040621\04kol_1_04062021_5.jpg~040621\04kol_2_04062021_5.jpg
===Caption===
फोटो (०४०६२०२१-कोल-मियावाकी घनवन प्रकल्प ०१ व ०२) : शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मियावाकी घनवन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशव्दार क्रमांक आठ ते मुलांचे वसतिगृह मार्ग या परिसरात पहिले घनवन साकारण्यात येणार आहे.~फोटो (०४०६२०२१-कोल-मियावाकी घनवन प्रकल्प ०१ व ०२) : शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मियावाकी घनवन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेशव्दार क्रमांक आठ ते मुलांचे वसतिगृह मार्ग या परिसरात पहिले घनवन साकारण्यात येणार आहे.