शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार, ईडीने सील काढल्यानंतरच कोल्हापूर जिल्हा बँकेचे होणार लेखापरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 11:39 IST

बॅंकेतील अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज ‘ईडी’ने कुलूपबंद केल्याने लेखापरीक्षणाची प्रक्रिया विलंबाने सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचा दुसरा केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा आदेश सहकार विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घाेरपडे साखर कारखाना, ब्रिक्स फॅसिलिटीज आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेतून कपात केलेले प्रत्येकी दहा हजार रुपये या तीन मुद्द्यांच्या आधारे हे लेखापरीक्षण होणार आहे. मात्र, बॅंकेतील अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज ‘ईडी’ने कुलूपबंद केल्याने लेखापरीक्षणाची प्रक्रिया विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केडीसीसीविरोधात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा उपनिबंधकांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल १ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांना प्राप्त झाला. त्यानंतर हे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था [लेखापरीक्षण] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रीकर यांनी बुधवारी संध्याकाळीच बॅंकेला भेट दिली. मात्र, ज्या मुद्द्यांबाबत लेखापरीक्षण करावयाचे आहे त्यातील बहुतांशी दस्तऐवज हा ‘ईडी’ने कुलूपबंद केला असल्याने प्राथमिक माहिती घेऊन ते परतले आहेत.सोमय्या यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा बॅंकेविरोधात ‘ईडी’ने केलेल्या कारवाईबाबत तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली; परंतु तक्रारींचे मुद्दे आणि कागदपत्रांच्या प्रती पाहिल्या असता तक्रार झालेल्या मुद्द्यांबाबत त्यातून स्पष्टता होत नाही, असा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. त्यानंतर आता चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.

या मुद्यांवर होणार लेखापरीक्षण

  • सन २०१७ ते २०१८ व २०२१ ते २०२२ या कालावधीत सरसेनापती संताजी घोरपडे या प्रामुख्याने मुश्रीफ कुुटुंबीयाच्या कंपनी साखर कारखान्याला बॅंकेने वेगवेगळ्या प्रकारची कर्जे दिली आहेत. याचे लेखापरीक्षण होणार आहे.
  • गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना पुणे येथील ब्रिक्स फॅसिलिटीज कंपनीने चालवायला घेतला होता. ही कंपनी मुश्रीफ यांच्याशी संबंधितांची असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या कंपनीलाही बॅंकेने किती कर्ज दिले, त्याची परतफेड कधी झाली..?
  • ३९ हजार ५३ शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली होती. त्यातून प्रत्येकी १० हजार रुपये कपात करून घेण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केली होता. याबाबतही तपासणी होईल.

दप्तर उपलब्ध करून देणे बॅंकेची जबाबदारीलेखापरीक्षणाला अधिकारी गेल्यानंतर त्यांना दप्तर उपलब्ध करून देणे ही संबंधित सहकारी संस्थेची जबाबदार असते, असे सहकार कायदा सांगतो. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे महत्त्वाचे दप्तर जरी ‘ईडी’ने कुलूपबंद केले असले तरीही ‘ईडी’शी लेखी पत्रव्यवहार करून लेखापरीक्षकांना हे दप्तर उपलब्ध करून देण्यासाठी बॅंकेलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यानंतर लेखापरीक्षणाला सुरुवात होणार आहे.

लेखापरीक्षण अहवालावर प्रश्नचिन्हनाबार्ड आणि वैधानिक लेखापरीक्षणामध्ये म्हणजेच बॅंकेच्या सीएनी केलेल्या परीक्षणामध्ये अनेक बाबी स्पष्टपणे नोंदवण्यात आलेल्या नाहीत. घोरपडे कारखान्याला आणि ब्रिक्स कंपनीला कर्ज देताना कर्ज मर्यादेचे उल्लंघन झाले आहे का, कर्ज देताना झालेले ठराव, प्रत्यक्ष कर्ज वितरण, त्याच्या तारखा, पुरेसे तारण घेतले आहे का, कर्जाची निश्चित कालावधीत परतफेड झाली का, अशा याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख वैधानिक लेखापरीक्षण अहवालात नाही. त्यामुळे यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

वैयक्तिक फायद्यासाठी निर्णय घेतले का ?घाेरपडे कारखान्याची उभारणी हसन मुश्रीफ यांनी केली. नलवडे साखर कारखाना बंद पडू नये म्हणून त्यांनी पुण्याच्या ब्रिक्स कंपनीची निवड केली. त्यामुळे हे सर्व निर्णय घेताना आणि या दोन्ही कारखान्यांना, कंपनीला कर्जपुरवठा करताना वैयक्तिक फायदा पाहून काही निर्णय घेतले आहेत का, याची खातरजमा या लेखापरीक्षणातून करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय