आमदार नीलेश लंके यांनी शशिकांत खोत यांच्याशी फोनवरून संपर्क साधत कोरोनाकाळात केलेल्या कामाचे कौतुक केले.
पंधरा दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सुरू झालेल्या या कापशी कोविड काळजी केंद्रात आजपर्यंत ९५ रुग्णांवर उपचार झाले आहेत. सध्या ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या या कोविड केंद्रात ६५ बेडची सोय करण्यात आली आहे. तिसरी लाट आलीच तर त्याचीही तयारी याठिकाणी सुरू केली आहे.
शशिकांत खोत या वेळी म्हणाले, सर्वसामान्य लोकांनी दिलेली ताकद आणि मंत्री मुश्रीफ यांचे पाठबळ यामुळे हे काम घडत असून, यातून आपल्याला आत्मिक समाधान मिळत असल्याचे सांगत आजपर्यंत केलेल्या सर्व समाजकार्यापेक्षा रुग्णसेवेचे हे काम खूपच समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले.