शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

Kolhapur: राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघात आबिटकरांचा हॅट्ट्रिकसाठी 'खेळ'; मेव्हण्या-पाहुण्यांचा जमेना 'मेळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:06 PM

महाविकासच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच : सतेज यांची भूमिकाही महत्त्वाची

शिवाजी सावंतगारगोटी : राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघात हॅट्ट्रिक करण्यासाठी सरसावलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीतून अनेकजण इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार के.पी पाटील, ए. वाय. पाटील हे मेव्हणे पावणे तसेच राहुल देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, संतोष मेंगाणे, प्रकाश पाटील प्रयत्न करीत आहेत. मनसेतून युवराज येडुरे पुन्हा एकदा रेल्वे इंजिन घेऊन जनतेसमोर जात आहेत. महविकास आघाडी उमेदवारी कुणाला मिळते यावरच येथील गणिते अवलंबून असतील.गत निवडणुकीत आठ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यावेळी हे सगळे इच्छुक सावध झाले आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. शिंदेसेनेतून आबिटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

या मतदारसंघात गत दोन्ही निवडणुकींत शिवसेनेतून आमदार आबिटकर हे विजयी झाले. त्यामुळे आघाडी धर्मानुसार ही जागा उद्धवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई हे तिकिटासाठी जोडण्या लावत आहेत. महाविकास आघाडीत उमेदवारी देताना आमदार सतेज पाटील यांचा शब्द महत्त्वाचा ठरणार आहे.महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार निश्चित झाला नसल्याने इच्छुकांसह मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणाला उमेदवारी मिळणार त्यावर पुढचे राजकारण अवलंबून आहे. एकास एक उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची धडपड सुरू आहे; परंतु इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही असा पवित्रा घेतल्याने त्यांना थांबविताना वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी होणार आहे.

उपरा आणि उसनाया मतदारसंघात उपरा आणि उसना उमेदवार नको अशी निष्ठावंतांची मागणी जोर धरत असल्याने ऐनवेळी बिघाडी होण्याची शक्यता आहे.

ए. वाय., देसाई यांच्या जोर बैठकाके. पी. पाटील यांच्यामुळे उमेदवारी मिळण्यात गेल्या दहा वर्षांत अडसर निर्माण होत आहे. हे जाणून लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ए वाय पाटील हे काँगेसमध्ये सामील झाले. राहुल देसाई हेदेखील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत सामील झाले. कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही, असे ठरवून या दोघांनी तयारी सुरू केली आहे.

२०१९ चा निकाल

सध्याचे मतदान

  • एकूण ३,४०,९७८
  • पुरुष..१,७५,८३७
  • महिला..१,६५,१२९
  • इतर..१२
टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४radhanagari-acराधानगरीA. Y Patilए. वाय. पाटीलK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर